शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

स्टीम सप्ताहात सर्वांचा सहभाग आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:13 IST

जीवनशैली, नियमित वाफ घेणे, आदींचा अवलंब केला पाहिजे. त्‍याबाबत जनजागृतीसाठी प्रशासनाकडून स्‍टीम सप्‍ताह २६ एप्रिल ते २ मे दरम्‍यान ...

जीवनशैली, नियमित वाफ घेणे, आदींचा अवलंब केला पाहिजे. त्‍याबाबत जनजागृतीसाठी

प्रशासनाकडून स्‍टीम सप्‍ताह २६ एप्रिल ते २ मे दरम्‍यान राबविण्‍यात येत असून सर्वांनी तो

यशस्‍वी करण्‍याचे आवाहन महापौर चेतन गावंडे यांनी केले.

कोरोना विषाणूला हरविण्‍यासाठी युध्‍दपातळीवर प्रयत्‍न सुरु आहेत. विविध

आरोग्‍यतज्‍ज्ञांच्‍या सल्‍ल्‍यानुसार व कोरोनावरील अनुभव व अभ्‍यासानंतर असे निदर्शनास

आले की, कोरोना विषाणूला पूर्णपणे हरविण्‍यासाठी या लढाईत सर्वांचेच प्रयत्‍न आवश्‍यक

आहेत. प्रत्‍येक घरातून त्‍याचा कायमचा समूळ नायनाट करण्‍याचा प्रयत्‍न स्‍टीम सप्‍ताह

राबवून आपल्‍याला करायचा आहे. मास्‍क लावणे, अंतर ठेवणे, हात धुणे, सॅनिटायझरचा

वापर, तसेच प्रतिकारशक्‍ती वाढविण्‍यासाठी पोषक आहार, व्‍यायाम, सुसंगत जीवनशैलीचा

अवलंब यात वाफ घेणे ही कृतीही समाविष्‍ट आहे, असेही महापौर चेतन गावंडे यांनी सांगितले.

वाफ घेण्‍यासारखी बाब आपल्‍याला तशी परिचित आहे. सध्‍याच्‍या काळात तिचे

महत्त्व मोठे आहे. या सप्‍ताहाच्‍या माध्‍यमातून तिचे महत्‍व प्रत्‍येकाच्‍या मनावर

बिंबवण्‍यासाठी उपयोग होणार आहे. या निमित्‍ताने प्रत्‍येकाने मी कोरोनाला हरविणारच हा

निर्धार केला पाहिजे, असे आवाहनही त्‍यांनी केले.

वाफ घेण्‍याबरोबरच व्हिटॅमिन सी, झिंक व मल्टिव्हिटॅमिन गोळ्यांचे सेवन, सकस

आहार व योग करण्‍याबाबतही विविध आरोग्‍यतज्‍ज्ञांनी सुचविले. दिवसातून तीन वेळा वाफ

घ्‍यावयाची आहे. आपल्‍या नाकावाटे वाफेस श्‍वसनाने शरीरात ओढणे व तोंडाने बाहेर

सोडण्‍याची ही प्रक्रिया १० वेळा करावयाची आहे. या प्रक्रियेकरिता दोन किंवा तीन मिनिटे

लागतात. साध्‍या पाण्‍याने वाफ घेतली तरीही उत्‍तम आहे. आरोग्‍य विभागातील विविध

आरोग्‍यतज्‍ज्ञांनी या वाफ घेण्‍याच्‍या पध्‍दतीला कोरोना विषाणूला हद्दपार करण्‍याकरिता

अत्‍यंत उपयोगी प्रक्रिया पडू शकते, असा विश्‍वास

महापौरांनी व्यक्त केला.