शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अभिनव कॉलनीतील प्रॉपर्टी ब्रोकरच्या घरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:28 IST

अभिनव कॉलनीतील एका प्रॉपर्टी ब्रोकरच्या घरातून अज्ञात चोरांनी तब्बल ४ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. चोरांनी बंद घराच्या दाराचे कुलूप तोडून चोरी केल्याचे गाडगेनगर पोलिसांच्या निदर्शनास आले. या घटनेतून चोरांनी पोलिसांना आव्हान उभे केले आहे.

ठळक मुद्देचार लाखांचा ऐवज लंपास : दाराचे तोडले कुलूप; पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अभिनव कॉलनीतील एका प्रॉपर्टी ब्रोकरच्या घरातून अज्ञात चोरांनी तब्बल ४ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. चोरांनी बंद घराच्या दाराचे कुलूप तोडून चोरी केल्याचे गाडगेनगर पोलिसांच्या निदर्शनास आले. या घटनेतून चोरांनी पोलिसांना आव्हान उभे केले आहे.अभिनव कॉलनीतील रहिवासी शोभा सुभाष पुरी यांच्याकडे वरच्या मजल्यावर भाड्याने राहणारे संजय वर्मा हे पत्नी व मुलीला घेऊन १७ फेबु्रवारी रोजी सायंकाळी लोणी टाकळी स्थित फुलआमला येथे सासरी मदन महाराज यात्रेकरिता गेले होते. मंगळवारी सकाळी त्यांना शेजाऱ्याने फोनवरून घरी चोरी झाल्याचे कळविले. त्यांनी तात्काळ अमरावती गाठून या घटनेची माहिती गाडगेनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी घराच्या दाराचे कुलूप तोडून चोर घरात शिरल्याचे निदर्शनास आले. चोरांनी आलमारीच्या लॉकरचे तोडून त्यातील ९० ग्रॅमचे सोन्याचे दागिने व १ लाख ७५ हजारांची रोख लंपास केली. ते मुलीच्या लग्नासाठी रकमेची जुळवाजुळव करीत असताना चोरट्यांना त्यांना हिसका दिला.श्रीरामनगरातही घरफोडीश्रीरामनगरातील रहिवासी पुंडलिक शंभुराव डकरे (६१) यांच्या घराचे कुलूप तोडून चोरांनी सोन्या-चांदीचा ऐवज व रोख असा एकूण १५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. त्यांनी या घटनेची तक्रार गाडगेनगर पोलीस ठाण्याकडे नोंदविली आहे.घरमालकाच्या खिडकीचे ग्रिल तोडण्याचा प्रयत्नशोभा पुरी यांचे दोनमजली घर आहे. तळमजल्यावर त्या स्वत:, तर वरच्या मजल्यावर संजय वर्मा राहतात. चोरांनी पुरी यांच्या खिडकीचे ग्रिल तोडण्याचे प्रयत्न केले. ग्रिलची एक सळाख त्यांनी तोडली. मात्र, अन्य लोखंडी बार चोरांकडून तुटले नसल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर चोरांनी संजय वर्मा यांच्या घरात शिरण्यासाठी पायऱ्याजवळ लागलेले चॅनल गेटचे कुलूप तोडले आणि पायऱ्यावरून वर चढल्यानंतर दाराचे कुलूप तोडल्याचे आढळून आले आहे.कार घेऊन आले होते चोरश्वानपथक व ठसेतज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले होते. श्वान वर्मा यांच्या घरापासून शंभर फुटांपर्यंत गेला. त्या ठिकाणी एका कारच्या टायरचे निशाण आढळून आले. त्यामुळे चोर हे कारने आल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.