शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

राज्य निवडणूक आयोगाची महापालिकेला ‘शो कॉज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 05:00 IST

अमरावती महापालिकेस वाढीव ९८ या सदस्यसंख्येनुसार ३३ प्रभागांचा प्रारूप आराखडा ३० नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाला पाठवायचा होता. त्या दिवशी तो प्रभागांचा कच्चा आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे पोहोचता करण्यात आला. मात्र, त्याच दिवशी तो फुटला. ३३ प्रभागांमधील संभाव्य लोकवस्तीचा समावेश असलेला त्या आराखड्याच्या प्रती त्याच दिवशी अर्थात ३० नोव्हेंबर रोजी माध्यमात व समाजमाध्यमात प्रकाशित व प्रसारित झाल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेची प्रभाग रचना स्थानिक स्तरावर ‘लीक’ झाल्याच्या प्रकाराची राज्य निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून, १ डिसेंबर रोजी याबाबत महापालिका आयुक्तांना ‘शो कॉज’ बजावण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून आयुक्तांना विचारणा करणारी ती प्रत ई-मेलने पाठविल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. याबाबत नेमकी काय कारवाई केली, हे सांगण्यासाठी ६ डिसेंबर रोजी महापालिका आयुक्तांना राज्य निवडणूक आयोगात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.अमरावती महापालिकेस वाढीव ९८ या सदस्यसंख्येनुसार ३३ प्रभागांचा प्रारूप आराखडा ३० नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाला पाठवायचा होता. त्या दिवशी तो प्रभागांचा कच्चा आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे पोहोचता करण्यात आला. मात्र, त्याच दिवशी तो फुटला. ३३ प्रभागांमधील संभाव्य लोकवस्तीचा समावेश असलेला त्या आराखड्याच्या प्रती त्याच दिवशी अर्थात ३० नोव्हेंबर रोजी माध्यमात व समाजमाध्यमात प्रकाशित व प्रसारित झाल्या. राज्य निवडणूक आयोगाने मागितलेला तो कच्चा आराखडा फुटल्याचा बभ्रा झाला अन् निवेदन, आक्षेपांचा पाऊस पडला. त्याची तातडीने दखल घेत, राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना विचारणा करण्यात आली आहे. यासंबंधी स्थानिक स्तरावरदेखील चौकशी समिती गठित करण्यात आल्याची माहिती आहे. 

महापालिका बेजबाबदार३० नोव्हेंबर रोजी महापालिकेने प्रभागांचा कच्चा आराखडा केएमएल स्वरूपात सादर केला. तो आराखडा सादर करण्यासाठी कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता, असा गंभीर आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्याच दिवशी माध्यमामध्ये प्रत्येक प्रभागात समाविष्ट होणारे क्षेत्र प्रकाशित झाले, ही बाब अत्यंत गंभीर आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचे काम गोपनीयरीत्या हाताळण्याबाबत सक्त सूचना केली होती. त्याउपरही हा प्रमाद कसा घडला, याबाबत महापालिका आयुक्तांना उत्तर द्यावे लागणार आहे.

तपासा, कारवाई करामाध्यमामध्ये प्रकाशित प्रभाग रचना महानगरपालिकेने आयोगास सादर केलेल्या प्रारूप आराखड्यानुसार आहे किंवा कसे हे तपासण्यात यावे, ते खरे असेल, तर आपण संबंधितांवर काय कारवाई केली, हे आयोगासमोर स्पष्ट करावे, असेही राज्य निवडणूक आयोगाने आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

देवाचा पुजारी कोण? प्रारूप आराखडा राज्य निवडणूक आयोगाच्या मुंबई येथील कार्यालयात सादर करण्याची जबाबदारी दोन अभियंत्यांकडे देण्यात आली होती. मात्र, त्यांनी ‘देवाचा पुजारी’ असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला मुंबईला पाठविले. त्यांनी तो प्रारूप आराखडा लीक करून, एकाला पेनड्राईव्हमध्ये देऊन व्हायरल केल्याचा आरोप होत आहे. आयुक्त त्या ‘एचएम’ व एसजी’वर नेमकी काय कारवाई करतात, याकडे महापालिका व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सुलभा खोडके यांची निवडणूक आयोगाकडे तक्रारयेत्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार केला. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने आखून दिलेेले निकष, तत्त्वांचे पालन करण्यात आले नाही. ३० नोव्हेंबर रोजी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर करण्यापूर्वी एका वृत्तपत्रातून तो प्रसिद्ध झाला. ही बाब अतिशय गंभीर असून, गोपनीयतेचा पूर्णत: भंग झाला आहे. प्रभाग रचनेची दिशा आणि भौगोलिक सलगता ठेवण्यात आली नाही. एवढेच नव्हे तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अल्पसंख्याक वस्त्यांचे तुकडे करता येणार नाही, या नियमावलीला पूर्णत: छेद देण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेने प्रभाग रचना प्रारूप करताना नियमांना बगल दिली आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, नव्याने प्रभाग रचना करावी, अशी मागणी आमदार सुलभा खोडके यांनी गुरुवारी राज्य निवडणूक आयाेगाच्या आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूक