शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

आपत्ती व्यवस्थापन राज्य संचालकांची अमरावतीला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 1:03 AM

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याशीसुद्धा अभय यावलकर यांनी चर्चा केली. आपत्ती उद्भवल्यास त्या त्याठिकाणी जिल्हा शोध व बचाव पथक कशा पद्धतीने आपत्तीला हाताळतात, याविषयी त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांशी संवाद : जिल्हा व्यवस्थापनाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र राज्य आपत्ती व धोके व्यवस्थापन कार्यक्रमाचे मुंबई येथील संचालक अभय यावलकर यांनी सोमवारी अमरावती येथे भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्तींविषयी चर्चा केलीजिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याशीसुद्धा अभय यावलकर यांनी चर्चा केली. आपत्ती उद्भवल्यास त्या त्याठिकाणी जिल्हा शोध व बचाव पथक कशा पद्धतीने आपत्तीला हाताळतात, याविषयी त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा व्यवस्थापक सुरेंद्र रामेकर यांनी जिल्हा शोध बचाव पथकांमध्ये सर्व प्रशिक्षित कर्मचारी असल्याची माहिती दिली. सर्व शोध व बचाव पथकातील कर्मचारी प्रशिक्षित असून, आपत्ती हाताळण्याचा अनुभव चांगल्या प्रकारचा असल्याबाबत त्यांना सांगण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दोन टीम अलर्ट असून, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दोन ट्रक तैनात आहेत तसेच अमरावती जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाविषयी क्षमता बांधणी कार्यक्रम प्रशिक्षण जनजागृती कार्यक्रम तसेच शाळा सुरक्षा कार्यक्रम महाविद्यालयीन स्तरावर एनएसएच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कार्यक्रम सुरू असल्याबाबत अवगत करण्यात आले. संचालकांनी सर्व साहित्याची पाहणी करून जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कायार्बाबत समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Socialसामाजिक