शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणनगर रस्त्याचे काम सुरू करा अन्यथा विभागाला ठोकणार कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 21:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : कल्याणनगर चौक ते यशोदानगर चौकापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. याकरीता ...

ठळक मुद्देशनिवारपर्यंतचा अल्टिमेटम : रवि राणा यांचा अधिकाऱ्यांना इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कल्याणनगर चौक ते यशोदानगर चौकापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. याकरीता कंत्राटदाराने रस्ता खोदला. पण, गेल्या काही आठवड्यापासून सदर कामे बंद असल्याने येथील व्यापाऱ्यांनी आ. रवि राणा यांच्याकडे तक्रार नेल्यानंतर त्यांनी शुक्रवारी व्यापाऱ्यांसमवेत सार्वजनिक बांधकाम विभागात बैठक घेतली. शनिवारपर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभागाला आपण कुलूप ठोकू, असा इशारा आ. राणा यांनी उपस्थित अभियंत्यांना दिला.आ. रवि राणा यांनी अधीक्षक अभियंता विवेक साळवे, कार्यकारी अभियंता सदानंद शेंडगे, दर्यापूरचे कार्यकारी अभियंता अनिल जवंजाळ व संबंधित विभागाचे उपअभियंता यांच्याकडून मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेतला. कल्याणनगर ते यशोदानगर हा रस्ता महत्त्वाचा असूनही गेल्या काही आठवड्यांपासून मशीन नादुरूस्त असल्याने बंद असल्याचे कारण देत कंत्राटदाराने हे काम बंद केले. या मार्गावर अनेक व्यापाऱ्यांची प्रतिष्ठाणे आहेत. रस्त्याचे खोदकाम केल्याने या ठिकाणी ग्राहक येत नाहीत. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. याबाबत व्यापाऱ्यांनी यावेळी संताप व्यक्त केला.कुठल्याही अधिकाऱ्याने लोकप्रतिनिधींच्या राजकारणात न पडता, आपले जे कर्तव्य आहे, ते चोख बजावावे. कुठल्याही वृत्तपत्राला राजकीय स्टेटमेंट देऊ नये, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा दमही आ. राणा यांनी भरला.कल्याणनगर परिसरातील व्यापारी बाबासाहेब शिरभाते, वसंतराव कडू, राजू मालवीय, अरुण बोबडे, संजय काळे, कैलास पवार, किशोर घोडेस्वार, नंदकिशोर बारबुद्धे, किशोर शिरभाते, देविदास गृप्ता, बबलू अग्रवाल, संजय मतानी, विजय जयस्वाल, सुनील चव्हाण, महेश खासबागे यांच्यासह युवा स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.