शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बेलोरा विमानतळाच्या माती परीक्षणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:14 IST

बेलोरा विमानतळाहून भविष्यात प्रवासी विमाने ‘टेक आॅफ’ आणि ‘लॅण्डिंग’ होण्याच्या अनुषंगाने सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात विमानतळाचे माती परीक्षण होत असून, प्रयोगशाळेत माती नमुने तपासणीसाठी पाठविले जातील.

ठळक मुद्देसंरचना, नियोजन : ‘राइट्स’ची चमू पोहोचली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बेलोरा विमानतळाहून भविष्यात प्रवासी विमाने ‘टेक आॅफ’ आणि ‘लॅण्डिंग’ होण्याच्या अनुषंगाने सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात विमानतळाचे माती परीक्षण होत असून, प्रयोगशाळेत माती नमुने तपासणीसाठी पाठविले जातील. हा अहवाल प्राप्त होताच विकासकामांची संरचना (डिझाईन), नियोजन (प्लॅनिंग) निश्चित होईल. दिल्ली येथील ‘राइट्स’ एजन्सीचे अधिकारी विमानतळावर तळ ठोकून आहेत.राज्य शासनाच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी व सामान्य प्रशासन विभागाच्या पुढाकाराने बेलोरा विमानतळाचे संरचना व नियोजनसंदर्भात एजन्सी नेमण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविली. त्यानुसार दिल्ली येथील राइट्स नामक एजन्सीकडे जबाबदारी सोपविली. तांत्रिक निविदेअंती राइट्ससोबत करारनामा करण्यात आला असून, तीन महिन्यांत विमानतळाचे विविध कामे पूर्ण करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यानुसार राइट्स कंपनीची चमू दोन दिवसांपासून विमानतळावर दाखल झाली आहे. रन-वे, मातीपरीक्षणसह अन्य कामांबाबत सर्वेक्षण केले जात आहे. शासन विमानतळाचे डिझाइन, प्लॅनिंगसंदर्भात राइट्सवर सव्वा दोन कोटी रूपये खर्च करणार आहे. २६ सप्टेंबरला राइट्सचे चार अधिकारी बेलोरा विमानतळावर डेरेदाखल झाले. ही चमू विमानतळाचे टोपो ग्रॉफिकल, भौगोलिक सर्व्हे, धावपट्टीचे निरिक्षण, एटीएस टॉवरची पाहणी केली. नाईट लँडिंग, रन-वे लांबीसंदर्भात नियोजन करतील.विमान कंपन्यांकडूनप्रवाशांची चाचपणीपुणे, मुंबई, हैद्राबाद, दिल्ली अशा महत्त्वाच्या शहरांसाठी अमरावती येथून विमानसेवा सुरू करण्याची तयारी राज्य शासनाची आहे. त्याअनुषंगाने काही खासगी विमान कंपन्यांनी शासनाकडे प्रस्ताव एअर बस चालविण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. अमरावती येथून पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने भविष्यात बेलारा विमानतळाहून या शहरांसाठी एअर बस सुरू होईल, असे संकेत आहे. मात्र, विमानतळाचे विकासकामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी निधीची मोठी कमतरता भासणार, असे चित्र आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी १५ कोटी मंजूर केले, उर्वरित ६० कोटींची प्रतीक्षा आहे.डिसेंबरपासून दुसºया टप्प्यातील कामांना प्रारंभदिल्ली येथील राइट्स एजन्सीच्या चमूने बेलोरा विमानतळ निरीक्षणास सुरुवात केली. तज्ज्ञांचा या चमूत समावेश आहे. संरचना व नियोजनाची कामे सुरु झाली आहेत. मात्र, बेलोरा विमानतळाची दुसºया टप्प्यातील विकासकामे डिसेंबरपासून सुरू होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.शासनाने बेलोरा विमानतळाची संरचना, नियोजनाची जबाबदारी ‘राइट्स’कडे सोपविली आहे. त्याअनुषंगाने दिल्ली येथील या एजन्सीची चमू विमानतळावर आली आहे. माती परीक्षणाचे काम सुरू झाले आहे.- एम.पी. पाठकप्रबंधक, बेलोरा विमानतळ