शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

श्री शिवशाही महोत्सवाला थाटात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:58 IST

स्थानिक रूख्मिणी सामाजिक विकास बहुउद्देशीय मंडळ आणि शिव सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गतवर्षीपासून आरंभलेल्या श्री शिवशाही महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रमाता जिजाऊ यांचे १३ वे वंशज सिंदखेड राजा येथील शिवाजी राजे जाधव यांच्या हस्ते गुरूवारी थाटात झाले.

ठळक मुद्देमराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन : शिवकालीन शस्त्रे, किल्ल्यांचे छायाचित्र प्रदर्शनी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक रूख्मिणी सामाजिक विकास बहुउद्देशीय मंडळ आणि शिव सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गतवर्षीपासून आरंभलेल्या श्री शिवशाही महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रमाता जिजाऊ यांचे १३ वे वंशज सिंदखेड राजा येथील शिवाजी राजे जाधव यांच्या हस्ते गुरूवारी थाटात झाले. मराठमोळ्या संस्कृतीसह शिवकालीन शस्त्रप्रदर्शन आणि रायगड किल्ल्याचे शिवकालीन छायाचित्र प्रदर्शनी हे महोत्सवाचे खास आकर्षण आहे.येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात दोन दिवसीय श्री शिवशाही महोत्सवाच्या उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी राजे भोसले होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, माजी महापौर विलास इंगोले, महापालिका काँग्रेसचे विरोधीपक्ष नेता बबलू शेखावत, डॉ. पंजाबराव देशमुख को-आॅपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष राजेंद्र महल्ले, जिजाऊ कर्मशियल बँकचे अध्यक्ष अविनाश कोठाळे, पुणे येथील अविनाश धर्माधिकारी, अमोल पाटील, महोत्सवाचे आयोजक भूषण फरतोडे, संपतराव देशमुख, नगरसेविका नूतन भुजाडे, जयश्री डहाके, सुचिता बिरे, महेश पवार, ठाणेदार मनीष ठाकरे आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनस्थ पुतळ्याचे पूजन व दीपप्रज्वलनाने महोत्सवाला सुरूवात झाली. अकोला येथील शिवाजी कला महाविद्यालयाचे शिरिष कडू व त्यांच्या चमुने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित पोवाडा सादर केला. प्रास्ताविक भूषण फरताडे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रमाता जिजाऊ यांचे १३ वे वंशज सिंदखेडराजा येथील शिवाजीराजे जाधव यांचा परिचय गजानन देशमुख यांनी करून दिला. दोन दिवसीय श्री शिवशाही महोत्सवातून राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन कार्य तरूण पिढीला चिरकाल स्मरणात राहील, असे मान्यवरांचे विचार मोलाचे ठरले. ‘यशाची पाऊलवाट’ या दमदार मार्गदर्शनातून आयएएस अविनाश धर्माधिकारी यांनी तरूणाईला रोजगाराचा वाटा शोधण्यासाठी दिलेल्या टीप्स त्यांच्यासाठी जणू शिदोरी ठरल्यात, हे विशेष.