शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

महापौर चषक कबड्डी स्पर्धेचा थाटात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 23:09 IST

नेताजी सामाजिक विकास संस्था व अमरावती महानगरपालिकाच्यावतीने आयोजित अखिल भारतीय महापौर चषक पुरुष व महिला गटातील कबड्डी स्पर्धेचे थाटत उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी महापौर संजय नरवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देअखिल भारतीय स्पर्धा : महिला व पुरुष गटात २८ संघ सहभागी

आॅनलाईन लोकमतअमरावती: नेताजी सामाजिक विकास संस्था व अमरावती महानगरपालिकाच्यावतीने आयोजित अखिल भारतीय महापौर चषक पुरुष व महिला गटातील कबड्डी स्पर्धेचे थाटत उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी महापौर संजय नरवणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुनील देशमुख होते.नेताजी सामाजिक विकास संस्थेच्या रुक्मिणीनगरातील प्रांगणावर १९ ते २१ जानेवारी दरम्यान प्रथमच देशपातळीवरील कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रांगणावर शेकडो क्रीडाप्रेमींना बसण्यासाठी भव्यदिव्य गॅलरी व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आ. अनिल बोंडे, मनपा आयुक्त हेमंत पवार, अरविंद को-आॅपरेटिव्ह बँकेचे संचालक प्रकाश मक्रमपुरे, रामेश्वर अभ्यंकर, किरण पातूरकर, हरिभाऊ मोहोड, नगरसेवक विजय वानखडे, गोपाल धर्माळे, माजी कुलगुरू गणेश पाटील, सुनील पडोळे, प्रमिला जाधव, जितू ठाकूर, मंडळाचे अध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष नितीन देशमुख, उपाध्यक्ष बाळासाहेब वानखडे, सचिव सतीश काळे, प्रफुल्ल देशमुख, शैलेश राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती होती. बापूरावजी वानखडे (आमलेकर) स्मृती पहिले पारितोषिक ७१ हजार ठेवण्यात आले आहे. जिजाऊ बँकेच्यावतीने महिला गटात पहिले पारितोषीक ४१ हजार रुपये आहे. याशिवाय अनेक परितोषिके खेळाडूंना देण्यात येणार आहेत.यांच्यामध्ये रंगला पहिला सामनापुरूष गटातील पहिला सामना हा नवशक्ती मंडळ (हैद्राबाद) व जागृती क्रीडा मंडळ (अमरावती) यांच्यात रंगला. महिला गटातील पहिला सामना श्री शिवाजी संघ (खामगाव) व करनाळा स्पोर्ट (रायगड) यांच्यात झाला. वृत्त लिहिस्तोवर दोन्ही सामन्यांचा निकाल हाती आला नव्हता. क्रीडाप्रेमींनी सामने पाहण्यासाठी मोठी गर्दी के ली होती. महिला गटातील १०, तर पुरुष गटातील १८ संघ सहभागी झाले आहेत.