शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

दर्यापुरात अवकाळीचा मारा सुरूच

By admin | Updated: March 13, 2015 00:17 IST

तालुक्यावर अवकाळी पावसाची वक्रदृष्टी कायम असून बुधवारनंतर गुरूवारीदेखील तालुक्याला पावसाने झोडपूून काढले.

किरण होले दर्यापूरतालुक्यावर अवकाळी पावसाची वक्रदृष्टी कायम असून बुधवारनंतर गुरूवारीदेखील तालुक्याला पावसाने झोडपूून काढले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने जगावे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. शेतकऱ्यांनी हरभरा कापून त्याचे ढीग शेतात रचून ठेवले होते. मात्र, बुधवारी पहाटे आणि गुरूवारी बरसलेल्या अवकाळी पावसाने हे पीक भिजले. त्यामुळे हरभरा काळा पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड हानी झाली आहे. यापूर्वीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची इतर पिके हातची गेली. त्यामुळे त्यांची सगळी भिस्त आता हरभऱ्यावरच होती. परंतु अवकाळी पावसाने हरभऱ्याचीदेखील पूरती वाट लावली आहे. परिसरातील काही शेतकऱ्यांचे २० ते २५ पोत्यांचे नुकसान झाले. शासनाकडून पुरेशी आर्थिक मदत मिळेलच याची काही शाश्वती नसल्याने पेरणीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत शेतकरी गुरफटला आहे. खरिपाचे पीक हातचे गेल्यानंतर सारी मदार रबी पिकावर होती. परंतु अवकाळी पावसाने रबीवरही कुठाराघात केला. हरभरा कापणीवर आला असताना अचानक पाऊस बरसल्याने सवंगणीत अडचणी निर्माण झाल्या. जेमतेम सवंगणी करून ठेवलेला हरभरा शेतात गंजी लावून ठेवला. त्यावर दोन दिवस पाऊस बरसल्याने काढणीला उसंत मिळू शकली नाही. त्यामुळे गंजीतला हरभरा पाण्यात ओला झाल्याने काळा पडण्याचे चिन्ह दिसू लागले आहे. पुन्हा शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांची पार दैना झाली आहे. शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी केली जात आहे.