शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

विधिमंडळात तारांकित; शिक्षकांना अशैक्षणिक कामे नकोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 10:52 IST

राज्यातील शिक्षकांना अशैक्षणिक कामे सोपविली जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत बाधा पोहोचत असल्याप्रकरणी २० आमदारांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला आहे.

ठळक मुद्देराधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण आदींचा पुढाकार

गणेश वासनिक।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यातील शिक्षकांना अशैक्षणिक कामे सोपविली जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत बाधा पोहोचत असल्याप्रकरणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणसह २० आमदारांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला आहे. पुढील सोमवारी या विषयावर विरोधी पक्षाचे सदस्य सरकारला धारेवर धरणार असल्याची माहिती आहे.‘राज्यातील शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देण्याबाबत’ यावर तारांकित प्रश्न क्रमांक १२६७२३ विधिमंडळाने स्वीकारला आहे. त्याअनुषंगाने विधानमंडळ सचिवालय कक्ष अधिकारी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून माहिती गोळा करीत आहेत. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे हे या प्रश्नाच्या अनुषंगाने विधिमंडळात उत्तर देणार असल्याची बाब स्पष्ट केली आहे. येत्या काळात निवडणुकांच्या अनुषंगाने नवीन मतदार यादी करण्यासाठी बीएलओ म्हणून शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. जे शिक्षक हे काम स्वीकारणार नाही, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून दाखल केले जाणार आहेत. एकीकडे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र साकारण्याचे उद्दिष्ट असताना, प्रत्यक्षात अध्यापनापेक्षा अशैक्षणिक कामांमध्ये शिक्षकांना गुंतवून ठेवण्याचा डाव रचला जात आहे. त्यामुळे शाळा प्रशासन आणि विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याप्रकरणी शासनाने चौकशी केली असल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कोणती कार्यवाही करण्यात आली? कार्यवाही केली नसल्यास विलंबाची कारणे आदी विषयांवर आमदारांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे.शिक्षणाचे तीनतेरा वाजत असताना राज्य सरकार मात्र त्याकडे लक्ष देत नाही. शिक्षकांवर अध्यापनाची प्रमुख जबाबदारी न सोपविता अशैक्षणिक कामे दिली जात आहे. हा विषय गंभीर असून, सरकारला तारांकित प्रश्नाच्या अनुषंगाने जाब विचारला जाईल.- राधाकृष्ण विखे पाटीलविरोधी पक्ष नेता, विधानसभा.राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा पाठपुरावाशिक्षकांवर अशैक्षणिक कामे सोपविण्याचा सपाटा सुरू झाला आहे. त्यामुळे अध्यापनकार्य दुय्यम होत चालले आहे. ही बाब शाळा व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला बाधा पोहचविणारी आहे. शासनाने यासंदर्भात विशेष काळजी घेण्याबाबतचा पाठपुरावा राज्य प्राथमिक शिक्षक समितीने घेतल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र