शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

स्टार प्रचारकांची वानवा

By admin | Updated: October 9, 2014 22:55 IST

राज्यात एकाच वेळी १५ आॅक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक होत आहे. प्रचाराचा ज्वर चढत असताना भाजप, सेना वगळता इतर पक्षांकडे स्टार प्रचारकांची वानवा जाणवते आहे.

अमरावती : राज्यात एकाच वेळी १५ आॅक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक होत आहे. प्रचाराचा ज्वर चढत असताना भाजप, सेना वगळता इतर पक्षांकडे स्टार प्रचारकांची वानवा जाणवते आहे. स्टार प्रचारकांचे दौरे, आणि प्रचारसभा अत्यल्प प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे भाजप, सेनेचे नेते मात्र त्यांच्या उमेदवारांसाठी जीवाचे रान करीत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात मागील आठवड्यात अजित पवार, सुप्रिया सुळे, राज ठाकरे, विनोद तावडे हे येऊन गेलेत. काही निवडणुकांचा आलेख तपासला तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारार्थ स्टार प्रचारकांनी फार गर्दी केली नाही. जिल्ह्यात सर्वच पक्षांचे नेते आपापल्या बळावर प्रचाराची धुरा सांभाळत असल्याचे दिसून येते. बड्या स्टार प्रचारकांची उमेदवार मोठ्या आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. स्टार प्रचारक आल्याशिवाय निवडणुकीला पोषक वातावरण तयार होत नाही. त्यामुळे अनेक उमेदवार पक्ष नेतृत्वाशी संपर्क साधून आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेनेचे राज्यस्तरीय नेते आपआपल्या मतदारसंघात गुंतल्याने मतदार संघाबाहेर पडणे त्यांना कठीण झाले आहे. आघाडी, युती संपुष्टात आल्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांचा प्रचारादरम्यान कस लागत आहे. येत्या बुधवारी विधानसभा निवडणूक असून उमेदवार ५० टक्के मतदारांपर्यत पोहोचू शकले नाहीत, हे वास्तव आहे. ज्या पक्षाकडे कार्यकर्त्यांची फळी तयार आहे, त्याच पक्षाच्या उमेदवारांचे चिन्ह आणि नाव मतदारांपर्यंत पोहोचले आहे. गाव, खेड्यात अद्यापही एक, दोन उमेदवार वगळता मैदानात असलेल्या उमेदवारांची नावेसुद्धा माहीत नाहीत. भाजप, सेनेच्या नेत्यांनी प्रचारात आघाडी घेण्यासाठी स्टार प्रचारकांना सभा, रोड शो, कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून मतदारांपुढे आणण्याची शक्कल लढविली आहे. मनसेचे राज ठाकरे हेसुद्धा जाहीर सभांच्या माध्यमातून मनसे उमेदवारांसाठी वातावरण निर्माण करीत आहेत. मात्र, जिल्ह्यातील मनसे उमेदवारांकरिता राज ठाकरे कितपत तारणहार सिध्द होऊ शकतात, हे लवकरच दिसून येईल. १३ आॅक्टोबरच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रचाराची रणधुमाळी चालणार आहे. त्याअनुषंगाने पुढील ६ दिवस जिल्ह्यात स्टार प्रचारकांचा ठिय्या राहील, अशी तयारी सर्वच पक्षांनी चालविली आहे. काँग्रेसने राहुल गांधी, अशोक चव्हाण, नारायण राणे, सुशीलकुमार शिंदे, मोहनप्रकाश, माणिकराव ठाकरे, मुकुल वासनिक आदी नेत्यांना जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारात उतरविण्याची रणनीती आखली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार, प्रफुल्ल पटेल, आर.आर. पाटील, छगन भुजबळ, मधुकर पिचड, जयंत पाटील आदी नेत्यांच्या प्रचारसभांचे नियोजन आखल्याची माहिती आहे. भाजपने नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, रामदास आठवले या नेत्यांना उमेदवारांच्या प्रचारार्थ आणण्याची जोरदार तयारी केली आहे. शिवसेनेने आदेश बांदेकर, आदित्य ठाकरे, रामदास कदम, मनोहर जोशी, दिवाकर रावते, संभाजी भोसले या स्टार प्रचारकांच्या सभा आयोजित करण्याचे ठरविले आहे. निवडणुकीला उणेपुरे आठ दिवस असताना प्रचारात जोश आलेला दिसत नाही. उमेदवार आपआपल्या पद्धतीने प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. येत्या काही दिवसांत स्टार प्रचारकांच्या गर्दीमुळे थोडेफार चित्र पालटणार, असा अंदाज वर्तविला जात आहे.