शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

धारणीत प्रशिक्षणाच्या नावाखाली दांडी मारण्याचा फंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:44 IST

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या मनमानी कारभाराला गटशिक्षणाधिकाऱ्यांकडूनच खतपाणी घातले जात असल्याने येथील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

ठळक मुद्देगटशिक्षणाधिकाऱ्यांची धृतराष्ट्राची भूमिका : मेळघाटात शिक्षणाचे तीनतेरा

आॅनलाईन लोकमतधारणी : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या मनमानी कारभाराला गटशिक्षणाधिकाऱ्यांकडूनच खतपाणी घातले जात असल्याने येथील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दुर्गम व अतिदुर्गम शाळेतील शिक्षक प्रशिक्षणाच्या नावाखाली आळीपाळीने कर्तव्य बजावून शाळा उघडण्याचे सोपस्कार पार पाडतात. मुख्यालयातील व तालुक्याच्या जवळपासच्या शिक्षकांनी नवीनच तंत्राचा वापर केला आहे.सध्या केंद्र शाळानिहाय शिक्षकांना विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रत्येक शाळेतील शिक्षकांना गुरूवार, शुक्रवार व शनिवार असे तीन दिवस प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी गुरुवार व शुक्रवारी १०.३० ते ५, तर शनिवारी सकाळी ७.३० ते ११ असे शालेय वेळापत्रकाप्रमाणे ठरविण्यात आले आहे. यासाठी निवड झालेल्या शिक्षकांना शाळेत जाण्यापासून सूट मिळते. प्रशिक्षण स्थळी चहा, नाश्ता व जेवणाची सुविधा केली जाते. मात्र, या प्रशिक्षणाला बहुतांश शिक्षक दांडी मारतात. शाळांमध्येही अनेक शिक्षक केवळ स्वाक्षरी करून गायब होत असल्याचे चित्र आहे. शनिवारीही स्वाक्षरी करून गावाकडे निघण्याचा सपाटाच शिक्षकांनी लावला. प्रस्तुत प्रतिनिधीने तालुक्यातील जुटपानी, बारू, बिजुधावडी, माणसुधावडी, गडगा मालूर, झिलांगपाटी, तातरा, मोगर्दा या शाळांना सकाळी ८ ते १०.३० दरम्यान भेटी दिल्या असता, या शाळांतील अर्धे शिक्षक बेपत्ता होते. शिक्षकच येत नसल्याने विद्यार्थीही दांड्या मारण्यात पटाईत झाल्याचे दिसून आले. एका वर्गात दोन ते चार विद्यार्थीच दिसले.गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून मिळते साचेबद्ध उत्तरपं.स. गटशिक्षणाधिकारी यांचे शिक्षणाकडे दुर्लत सतत होत असते. तक्रारींवर कारवाई ऐवजी ‘समायोजन’ करण्याकडेच त्यांचे प्राधान्य असते. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता, ‘मी चौकशी करतो’ असे नेहमीचे साचेबद्ध उत्तर मिळाले.शनिवार व सोमवारी हमखास दांडीतालुक्यातील जि. प. शाळेतील आठवड्यातील पहिला दिवस व शेवटच्या दिवशी शिक्षकांची उपस्थिती नगण्य असते. सोमवारी उशिरा शाळेत पोहोचणे व शनिवारी जमल्यास दांडी मारणे किंवा लवकर निघून जाणे हा क्रमच ठरला आहे. याकडे केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांचे कमालीचे दुर्लक्ष असून, नुकसान गरीब विद्यार्थ्यांना होत आहे.