शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सीईओद्वारा कर्मचाऱ्यांची झाडाझडती

By admin | Updated: August 25, 2016 00:04 IST

जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांनी बुधवारी सामान्य प्रशासन विभागात पोहचून ....

थेट संवाद : कामकाजाची जाणून घेतली माहितीअमरावती: जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांनी बुधवारी सामान्य प्रशासन विभागात पोहचून त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतलीे. कोणाकडे कोणती जबाबदारी हे जाणून घेताना अनेक कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली.ग्रामीण भागाच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. स्थानिक स्वराज संस्थेच्या प्रशासकीय कामांचा व्यापही तेवढाच मोठा आहे. त्यामुळे अनेक प्रकारची प्रशासकीय कामे जिल्हा परिषदेचे प्रमुख म्हणून मुख्यकार्यकारी अधिकारी यांना करावी लागतात. त्यामुळे प्रत्येक विभागाची प्रशासकीय माहिती प्रशासन चालविताना जास्तीत जास्त असल्यास काम करणे सुध्दा अधिक सोपे होते. एवढेच नव्हे तर ज्या प्रशासकीय कामाची जबाबदारी कर्मचारी सांभाळतात त्यांची व्यक्तिश: ओळख, नाव, कर्तव्याची माहिती असल्यास प्रशासकीय कामकाज सुलभ होवून नागरिकांचीही कामेही वेळेत होवू शकतात. नेमकी हीच बाब हेरून सीईओ कुलकर्णी यांनी सामान्य प्रशासन विभागात आकस्मिक भेट देऊन तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांना एकत्र बोलवून प्रत्येक कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला. कार्यरत कर्मचाऱ्यांची प्रशासकीय कामाची गतीमानता तपासण्यासाठी सीईओंनी एका कर्मचाऱ्यास चक्क वरूड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कोण? असा प्रश्न विचारला आणि त्याच्या वेतनाची डायरी किती वेळात दाखवू शकता? असा प्रश्न या कर्मचाऱ्याला केला. लगेच डायरी आणण्याचे फर्मान त्यांनी सोडले. क्षणात सदर कर्मचाऱ्यानेही कपाटातील बीडीओंची डायरी आणून सीईओंने घेतलेली ही परीक्षा उत्तीर्ण केली. कर्मचाऱ्यांसोबत थेट संवाद साधल्यानंतर सीईआेंंनी काही महत्वाच्या सूचना करून नागरिकांची तसेच सर्व प्रकारची कामे गतीने करण्यासाठी महत्वाच्या सूचना देऊन त्यांची दर आठवडयाला खातेप्रमुखांनी बैठक घ्यावी. या बैठकींना मी सुध्दा एखाद्या वेळी उपस्थित राहून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल, असा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश तट्टे उपस्थित होते. सीईओंचा थेट संवाद पाहून कर्मचाऱ्यांचा सुरूवातीचा पडलेला चेहरा त्यांच्या प्रशासकीय मार्गदर्शनंतर उत्साहवर्धक दिसून आला. सीईओंची समन्वयातून काम करण्याची पध्दत असल्याचे दिसून आले.(प्रतिनिधी)