शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
3
पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार...
4
बापरे! अवघ्या ७ महिन्यात २३ वर्षीय युवतीनं २५ युवकांचं आयुष्य केले बर्बाद, काय आहे प्रकार?
5
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
6
कोविडचे रुग्ण वाढताहेत, भारताला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका? ICMR च्या माजी तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 
7
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
8
सासू असावी तर अशी! लग्नानंतर सुनेने शिकण्याची इच्छा व्यक्त करताच हात धरून नेलं शाळेत
9
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
10
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
11
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती
12
Mumbai Weather : वीजा कडाडणार, वादळीवारे सुटणार! हवामान खात्याकडून मुंबईला २१ जूनपर्यंत यलो अलर्ट
13
शपथ घेताच छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “गृहमंत्रालयही सांभाळले आहे, आता...”
14
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
15
स्टेडियममधून पाकिस्तानी खेळाडूंची नावं, फोटो काढून टाकले; 'या' शहरात घेतला गेला निर्णय
16
बाबो! ३ मुलांची आई सासऱ्यासोबत झाली फरार; पतीने जाहीर केलं २० हजारांचं बक्षीस
17
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
18
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
19
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?

‘सरल’च्या धर्तीवर पटपडताळणी

By admin | Updated: October 27, 2015 00:30 IST

राज्यातील १ ते १२ वीपर्यंतचे विद्यार्थी, शाळा आणि शिक्षकांची माहिती संकलित करण्यासाठी ‘सरल’ प्रणाली अवलंबविल्या गेली.

समितीची प्रत्यक्ष भेट : व्यवस्थापनाचे सहकार्यअमरावती : राज्यातील १ ते १२ वीपर्यंतचे विद्यार्थी, शाळा आणि शिक्षकांची माहिती संकलित करण्यासाठी ‘सरल’ प्रणाली अवलंबविल्या गेली. या प्रणालीच्या यशस्वीतेच्या पार्श्वभूमिवर विभागातील महाविद्यालयांची पटपडताळणी होणार आहे. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ही मोहीम हाती घेतली असून विभागाकडून गुप्तता बाळगल्या जात आहे. शाळांमधील पटमोजणी संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली होती. त्या अनुषंगाने महाविद्यालयातील मुलभूत, शैक्षणिक सुविधा आणि इतर बाबींची तपासणी मोहिम राबविताना कोणताही गाजावाजा होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या आणि सर्व प्रकारच्या महाविद्यालयांमध्ये ही मोहीम राबविली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. बनावट विद्यार्थी संख्या दाखवून शिष्यवृत्तीसह अनुदान लाटण्याचे प्रकार राज्यात अनेक ठिकाणी उघड झाले. त्यावर चाप लावण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आल्याचेही उच्च व तंत्र शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. मात्र याबाबत विद्यापिठाला अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे एक समितीदेखील प्रत्येक महाविद्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन वर्ग आणि वेळापत्रक जाणून घेत आहेत.