शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे आरक्षण नावालाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:36 IST

बसमध्ये जागा मिळण्याकरिता बाहेरूनच दुपट्टा, रुमाल व बॅग टाकून आरक्षित केलेल्या जागेवर बसण्यासाठी प्रवाशांची आपापसात तू-तू, मै-मै होते. यात वाहक मध्यस्थी करीत नसल्याने प्रकरण हातापाईवर जात असल्याने वाहकांची डोकेदुखी वाढली आहे.

ठळक मुद्देगैरसोय : आरक्षित जागेवर बसण्यासाठी प्रवाशांत तू-तू, मैं-मैं

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बसमध्ये जागा मिळण्याकरिता बाहेरूनच दुपट्टा, रुमाल व बॅग टाकून आरक्षित केलेल्या जागेवर बसण्यासाठी प्रवाशांची आपापसात तू-तू, मै-मै होते. यात वाहक मध्यस्थी करीत नसल्याने प्रकरण हातापाईवर जात असल्याने वाहकांची डोकेदुखी वाढली आहे.नागपूरहून अकोलाकडे जाणाºया प्रत्येक बसचा थांबा अमरावती बसस्थानकात आहे. प्रत्येक बसची येण्या-जाण्याची नोंद येथील बसस्थानकात चालकास करावी लागते. असे असताना अमरावती बसस्थानकात विचित्र प्रकार घडताना दिसून येत आहेत.दुपट्टा ठेवून आसन आरक्षित केलेल्या प्रवाशाने उठ म्हटल्यास वाद निर्माण होत असल्याचे चित्र आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने बसमध्ये गर्दी वाढली आहे. एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना अर्धे तिकीट, ४० टक्के किंवा त्याच्या पुढे अपंग असलेल्यांना ‘वन फोर्थ’ अशा सवलतीच्या योजना सोबत ज्येष्ठ नागरिक, अपंग नागरिक, माजी सैनिक, सैनिक, पत्रकार, महिला अशांना एसटीतील काही आसने आरक्षित ठेवलेली असतात.काही दिवसांपासून सणासुदीच्या दिवसांत विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाºयांनी चार दिवस संप पुकारला. त्यामुळे प्रवाशांची कोंडी झाली होती. चार दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर एसटी सुरू झाली. मात्र आता जागा आरक्षणाच्या मुद्यावर प्रवाशांमध्ये जुंपत असल्याने वाहकांची कोंडी होऊ लागली आहे.वाहकांची मध्यस्थी महत्त्वाचीप्रत्येक बसमध्ये ठरल्याप्रमाणे आसन आरक्षित असताना अशा आसनावर सदर प्रवासी आल्याशिवाय कुणाला बसू देऊ नये किंवा वाहकांनी प्रत्येक स्टेशनवर मुनादी देण्याची तरतूद असावी, अशा सूचना द्यायला हव्यात. परंतु किरकोळ मुद्यावर वाहकांनी प्रवाशांसोबत वाद करू नये, अशा सूचना देण्यात आल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाºयांनी सांगितले.