शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बस होणार ६७ वर्षांची!

By admin | Updated: May 31, 2015 00:15 IST

सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला येत्या ...

१ जूनला परिवर्तन दिन : एसटी आगारात विविध कार्यक्रम अमरावती : सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला येत्या सोमवारी म्हणजेच १ जून रोजी ६७ वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने साजऱ्या केल्या जाणाऱ्या परिवहन दिनानिमित्त एसटी महामंडळाने जिल्ह्यासह राज्यभरातील सर्वच आगारांमध्ये विविध उपक्रम जाहीर केले आहेत. या उपक्रमांमध्ये प्रवाशांना उत्तम सेवा देण्यावर भर दिला आहे. त्यासोबतच उत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव केला जाणार आहे. विशेष म्हणजे या दिवशी प्रत्येक प्रवाशाचे फूल देऊन स्वागत करण्यात येईल. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काही महिन्यातच नगर ते पुणे या मार्गावर एसटी महामंडळाची पहिली बस १ जून १९४८ रोजी धावली होती. तेव्हापासून हा दिवस एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, मागील वर्षीपासून हा दिवस परिवहन दिन म्हणून साजरा करण्याची पद्धत राज्य परिवहन महामंडळाने सुरू केली आहे. या दिवशी एसटीचे कर्मचारी आणि प्रवाशी यांना केंद्रस्थानी ठेवण्यात येऊन अनेक कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील सर्व एसटी आगारामध्ये विविध कार्यक्रम दिवसभर साजरे केले जाणार आहेत.परिवहन दिनाचे औचित्य साधून एसटीच्या ताफ्यातील सर्व बसगाड्या आतून व बाहेरून स्वच्छ करण्यात येणार आहेत. यामागे प्रवाशांना एसटीचा प्रवास आल्हाददायक वाटावा, हा उद्देश आहे. त्याशिवाय एसटीची सर्व बसस्थानके स्वच्छ आणि सुशोभित केली जातील. या दिवशी एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांचे स्वागत पुष्प देऊन केले जाणार आहे. एसटीच्या सर्व आगारात उत्तम कामगिरी करणारे वाहक-चालक, यांत्रिक विभागातील कर्मचारी यांचाही गौरव प्रत्येक आगारात करण्यात येईल. विशेष म्हणजे या दिवशी एसटीचे अधिकारी प्रत्येक बसस्थानकावर प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतील. (प्रतिनिधी)