शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
2
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
3
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
4
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
5
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
6
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
7
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
8
Chaturmas 2025: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
9
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
10
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
11
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
12
कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही; अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर भारताची स्पष्टोक्ती
13
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
14
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे (Watch Video)
15
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
16
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
17
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
18
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
19
एकेकाळी दारुचे पाट वाहिलेल्या दिल्लीत, प्रचंड बिअर टंचाई; भलेभले ब्रँड शोधूनही सापडत नाहीत...
20
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या

श्वानांनी केली चितळाची शिकार, नाव बिबटाचे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 23:25 IST

वडाळीच्या जंगलात भटक्या श्वानांचा वावर वाढला असून, श्वानांनी चितळाचा फडशा पाडला. ही शिकार बिबट्याने केल्याची दावा वनविभागाने केला आहे. जंगल संवर्धनासाठी वन्यप्रेमींची धडपड सुरू असताना, वनविभाग या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे.

ठळक मुद्देवनविभागाचे दुर्लक्ष : वनसंवर्धनासाठी वन्यप्रेमींची धडपड

आॅनलाईन लोकमतअमरावती : वडाळीच्या जंगलात भटक्या श्वानांचा वावर वाढला असून, श्वानांनी चितळाचा फडशा पाडला. ही शिकार बिबट्याने केल्याची दावा वनविभागाने केला आहे. जंगल संवर्धनासाठी वन्यप्रेमींची धडपड सुरू असताना, वनविभाग या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे.शहरालगत समृद्ध जंगलाचा ठेवा आहे. मात्र, दिवसेंदिवस जंगलाचा ऱ्हास होताना दिसून येते. वडाळी वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात अधिवास असून, हे जंगल जैवविविधतेचे भंडार आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत नागरी हस्तक्षेप वाढल्याने जंगलातील वन्यप्राण्यांच्या अधिवासावर गदा आली आहे. त्यातच आता मोकाट व भटक्या श्वान वन्यप्राण्यांच्या जिवावर उठले आहे. वडाळी वनपरिक्षेत्रात शहरी श्वानांचा हैदोस वाढला आहे. वन्यप्राण्यांचा अधिवास धोक्यात आलेला आहे. मंगळवारी वडाळी वनपरिक्षेत्रातील एका तलावावर श्वानांच्या कळपाने एका नर चितळाची शिकार केली. दुसऱ्या दिवशी गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यांना चितळाचा अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन केले. घटनास्थळी आढळलेल्या बिबट्याच्या पायाचे ठसे व चितळाला खाण्याची पद्धत पाहून निष्कर्ष वनविभागाने काढला. मात्र, ही शिकार श्वानाने केल्याचा आरोप वन्यप्रेमी करीत आहेत. त्यामुळे चितळाची शिकार कुणी केली असावी, याबाबत संभ्रम कायम आहे.शवविच्छेदन ‘आॅन द स्पॉट’ का नाही ?वन्यजीव अधिनियमांनुसार बिबट्याने शिकार केली, तर त्या वन्यप्राण्याला त्याच ठिकाणी ठेवावे लागते. याकडे वनकर्मचाऱ्यांना लक्ष ठेवण्याचे काम करावे लागते. मात्र, वनविभागाने चितळाचा मृतदेह ट्रकमध्ये टाकून शवविच्छेदनासाठी नेले होते.श्वानांच्या बंदोबस्तासाठी महापालिकेस पत्रवडाळी जंगलात फिरणाऱ्या मोकाट श्वानांचा बंदोबस्त लावून कारवाई करण्यासंदर्भात उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांनी वडाळी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निर्देश दिले. सोबतच जंगलात भटकणाºया श्वानांच्या बंदोबस्तासाठी महापालिका आयुक्तांना पत्र दिले जाईल. शहरी भागातील श्वान पकडून जंगलात सोडले जात असल्याने त्यांचा वावर वाढल्याचे निदर्शनास येत आहे