शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi Honoured With Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
2
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
3
सोनं झालं 'लखपती', Gold-Silver चे दर गगनाला भिडले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवी किंमत
4
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
5
ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळेल ६०,००० पेक्षा जास्त पेन्शन, 'या' योजनेत करा गुंतवणूक
6
"घाबरत नाही...", अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर रवीना टंडनचा एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास, म्हणते...
7
Donald Trump: ...तर अमेरिकी फौजा तुटून पडतील; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा!
8
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...
9
Israel Iran Conflict : इस्त्रायली हल्ल्यात इराणमध्ये दोन भारतीय विद्यार्थी जखमी; भारताने परत आणण्याची तयारी केली, या मार्गाने आणले जाणार
10
MI6 ला पहिल्यांदाच मिळाली महिला 'चीफ', कोण आहेत गुप्तचर प्रमुख ब्लेझ मेट्रेवेली? जाणून घ्या
11
Women’s World Cup 2025 : ठरलं! या दिवशी रंगणार भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना
12
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
13
७२ तासांच्या युद्धात भीषण विध्वंस! ४०६ इराणींचा मृत्यू, इस्रायलचे किती नुकसान? जाणून घ्या...
14
"इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा", काँग्रेसची मागणी
15
VIDEO : 'मी घरीच आहे अन्...', लाइव्ह कॅमेरॅवरच डेल स्टेनला रडू कोसळलं; नेमकं काय घडलं?
16
शूटिंगसाठी निघालेल्या मॉडेलची निर्घृण हत्या;मृतदेह कालव्यात फेकला, टॅटूवरून पटली ओळख
17
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
18
Pune Bridge Collapse: पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन
19
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
20
इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट

गणेशमूर्ती विघटनासाठी रसायनांची फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 22:53 IST

प्रथमेश तलावात विर्सजित करण्यात आलेल्या गणेशमूर्तींच्या विघटनासाठी महापालिकेने काहीच केले नसल्यामुळे पर्यावरणाची हानी व मूर्तीची विटंबना होत असल्याचे सचित्र वृत्त ‘लोकमत’ने बुधवारी जनदरबारात मांडले. याची गंभीर दखल घेत संबंधित चार विभागांनी बुधवारी या मूर्तींच्या विघटनासाठी रसायनांची फवारणी केली.

ठळक मुद्देउशिरा आली जाग : चार विभागांची संयुक्त कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रथमेश तलावात विर्सजित करण्यात आलेल्या गणेशमूर्तींच्या विघटनासाठी महापालिकेने काहीच केले नसल्यामुळे पर्यावरणाची हानी व मूर्तीची विटंबना होत असल्याचे सचित्र वृत्त ‘लोकमत’ने बुधवारी जनदरबारात मांडले. याची गंभीर दखल घेत संबंधित चार विभागांनी बुधवारी या मूर्तींच्या विघटनासाठी रसायनांची फवारणी केली.महापालिकेने अतिक्रमण विभाग, झोन क्र. ३, पर्यावरण व प्रदूषण विभाग व आरोग्य विभाग यांनी संयुक्त कार्यवाही करीत या गणेशमूर्ती विघटनासाठी रसायनांची फवारणी केली. एकाच ठिकाणी या मूर्ती विघटित करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. गणेश विर्सजनासाठी पक्क्या टाक्या निर्माण करणे, प्लास्टर आॅफ पॅरीस विरघळविण्यासाठी अमोनियम बायकार्बोनेटच्या भुकटीचा वापर महत्त्वाचा आहे.किंबहुना बऱ्याच ठिकाणी तो झालाच नाही. आयुक्तांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मूर्तीच्या रंगातील जड क्षार, पारा, शिशे, कॅडमिअम यासारखे घटक भूगर्भात शिरून नागरिकांना घातक आजारासाठी कारणीभूत ठरू शकतात आणि या जल व वायू प्रदूषणासाठी आयुक्तांवरदेखील कारवाई होऊ शकते, याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच एकच खळबळ उडाली. उशिरा का होईना, महापालिकेला जाग येऊन दरवर्षीप्रमाणेच प्रक्रिया करण्यात आली.