शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अस्वच्छता आढळल्यास ‘स्पॉट फाईन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 23:58 IST

घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्या तरतुदींचे पालन न करणाऱ्या व्यक्तींना स्पॉट फाईन (जागेवरच दंड) करण्याचे अधिकार महापालिकांना प्रदान करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देनगरपालिका, महापालिकांना अधिकार : दंडाची रक्कम निश्चित, स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अनुषंगाने निर्णय

प्रदीप भाकरे ।आॅनलाईन लोकमतअमरावती : घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्या तरतुदींचे पालन न करणाऱ्या व्यक्तींना स्पॉट फाईन (जागेवरच दंड) करण्याचे अधिकार महापालिकांना प्रदान करण्यात आले आहेत. सुरूअसलेल्या स्वच्छ महाराष्ट्र मिशन व स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला.राज्यातील सर्व शहरांमध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी सुरू असून अभियानांतर्गत ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही, अशांना शौचालय बांधून देऊन राज्याचा संपूर्ण नागरी भाग हागणदारीमुक्त घोषित केला आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार निर्मितीच्या जागीच कचरा विलगीकरण, घनकचरा व्यवस्थापन हाती घेण्यात आले आहे. कचरा विलगीकरणाची जबाबदारी संबंधित कचरा निर्मितीकर्त्त्यांवर टाकली आहे. मात्र, या अभियानाला नागरिकांकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत १ मे २०१७ पासून राज्यातील प्रत्येक शहरात कचरा लाख मोलाचा या अंतर्गत निर्मितीच्या जागीच कचऱ्याचे विलगीकरण व त्यावर प्रक्रिया करण्याच्या सूचना नागरी स्वराज्य संस्थांना दिल्या आहेत. नगरविकास विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्या अनुषंगाने महापालिका, नगरपालिका व नगरपंचचायती स्वच्छतेसाठी झगडत आहेत. स्वच्छतेसाठी नागरिकांकडूनही सहकार्य मिळणे अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमिवर जे नागरिक सहकार्य करीत नाहीत, त्यांना दंड आकारले जाईल. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्यातरतुदींचे पालन न करणाऱ्या व्यक्ती वा संस्थांवर दंडात्मक कारवाईचे अधिकार महापालिकांना आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ४५० अ मधील तरतुदीनुसार हे अधिकार देण्यात आले आहेत. यापूर्वीही महापालिका अस्वच्छता करणाऱ्याकडून दंड आकारत होती. मात्र, नगरविकास विभागाने ३० डिसेंबरला अधिकृत शासन निर्णय जाहीर करून महापालिकांना तसे अधिकार प्रदान केलेत, यावर शिक्कामोर्तब केले आहे. दंडाचे प्रावधान अ, ब , क, ड असे महापालिका वर्गनिहाय करण्यात आले आहे.घाणीची व्याख्याघाण म्हणजे ज्यापासून उपद्रव होऊ शकेल, असे टाकाऊ पदार्थ, धूळ, अस्वच्छ परिस्थिती तसेच नियमान्वये प्रतिबंधित करूनही सार्वजनिक सुव्यवस्था, पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य, सुरक्षित जीवन व स्वास्थ्यास बाधा येईल, अशी अस्वच्छता होय. तर घाण करणे म्हणजे सार्वजनिक अथवा खासगी ठिकाणी निष्काळजीपणे टाकलेली, फेकफेफी, पसरवलेली, अथवा सुटलेली घाण.