शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

क्रीडा संकुलाचे प्रवेशद्वार प्रेमीयुगुलांचा अड्डा !

By admin | Updated: February 13, 2017 00:03 IST

विभागीय क्रीडा संकुलाचे प्रवेशव्दार प्रेमीयुगुलांचा अड्डा बनले आहे. तासन्तास तोंडाला रुमाल बांधून उभे दुचाकींवर बसून गप्पा मारणाऱ्या तरूण-तरूणी, ....

आक्षेपार्ह चाळे : क्रीडा उपसंचालक, पोलिसांचे दुर्लक्षसंदीप मानकर अमरावतीविभागीय क्रीडा संकुलाचे प्रवेशव्दार प्रेमीयुगुलांचा अड्डा बनले आहे. तासन्तास तोंडाला रुमाल बांधून उभे दुचाकींवर बसून गप्पा मारणाऱ्या तरूण-तरूणी, खुलेआम अश्लील चाळे करणारे अल्पवयीन जोडपे येथे दररोज आढळत असतानाही याकडे क्रीडा उपसंचालकांचे दुर्लक्ष होत असल्याने सार्वजनिक ठिकाणी चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलांवर पोलीस कारवाई करणार का, असा प्रश्न सभ्य नागरिकांना पडला आहे. येथील क्रीडा संकुलाचे उजव्या बाजुचे प्रवेशव्दार रात्री बंद असते व येथे आंधार असतो. त्यामुळे शहरातील प्रेमीयुगुल अंधाराचा फायदा घेऊन सायंकाळी ७ वाजतापासून रात्री उशिरापर्यंत याठिकाणी तोंडाला रूमाल बांधून तासन्तास उभे राहतात. काही प्रेमीयुगुल तर दुचाकी आडोशाला लाऊन अनेकदा अश्लिल चाळे करताना दिसतात. त्यामुळे सभ्य नागरिकांना येथून खाली मान घालूनच जावे लागते. काही महिन्यांपूर्वी हा प्रकार ‘लोकमत’ने लोकदरबारात मांडून येथील प्रेमीयुगुलांचा वावर बंद केला होता. विभागीय क्रीडासंकुलाच्यावतीने याठिकाणी हॅलोेजन लाईट लावले होते. तो दरवाजा रात्री नागरिकांसाठी खुला केला होता. याठिकाणी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते. गाडगेनगर पोलिसांनीही पेट्रोलिंग करुन प्रेमीयुगुलांवर आळा घातला होता. त्यामुळे काही महिने येथील वातावरण सुधारले होते. परंतु आता परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली आहे. क्रीडासंकुलच्यावतीने हा दरवाजा रात्रीच्या वेळीस बंद ठेवण्यात येतो. येथील प्रवेशव्दाराजवळील दिवेही बंद असतात. त्यामुळे प्रेमीयुगुलांनी पुन्हा येथे आपला अड्डा तयार केला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी अश्लिल चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. सभ्य नागरिकांना दिलासा देण्याकरिता हे पाऊल उचलणे गरजेचे आहे. पोलिसांची मिलीभगतक्रीडा संकुलाचे प्रवेशद्वार आणि परिसरातील गाळ्यांसमोर झुंडीने तरुण तरुणी रात्री उशिरापर्यंत गप्पा मारतात. हा परिसर त्यांच्या चोरभेटीचे आवडते ठिकाण झाले आहे. उर्मट आणि उद्धट वागणारे अनेक टारगट तरुण तेथे ठिय्या मांडून असतात. पॅसिव्ह स्मोकिंग, डिस्पोजेबल ग्लासेसच्या मदतीने दारु पार्टी, मुलींशी अश्लिल चाळे, हुल्लडबाजी असले प्रकार रोज सर्रास चालतात. परिसरातील गाळ्यांसमोर आणि रस्त्यावर वाहने पार्क करुन मुलगा किंवा मुलगी कुणा एकाच्या बाईकवर निघून जातात. तरुणांची ही गर्दी बघून परिसरात निवांत उपलब्ध करुन देणारे चार कॉफी आणि आईसक्रीम पार्लर भूछत्र उगवावे तसे सुरू झाले. सर्वच पार्लर हाऊसफुल्ल असतात. आश्चर्य असे की जोडप्यांचा त्रास होत असल्याची तक्रार गाडगेनगर पोलीस ठाण्यात परिसरातील कार्यालयांतून फोनद्वारे करण्यात आल्यावर पोलीस येतात, यारबाजीच्या गोष्टी होतात आणि गुडफेथमध्ये तात्पुरते त्या तरुणांना जायला सांगितले जाते. नंतर हे पोलीस तक्रारकर्त्यांच्या फोनवर संपर्क साधून रागावण्याचा खोटा-खोटाच आवाज काढतात आणि साहेब, आम्ही त्यांना भगवले, असे सांगतात. पोलिसांची या अड्ड्यात मिलिभगत असल्याचेच त्यातून स्पष्ट होते.