संदेश : ‘पर्यावरणाचा घेऊन वसा, आता तरी सायकलवर बसा’परतवाडा : ‘पर्यावरणाचा घेऊन वसा, आता तरी सायकलवर बसा’, असा संदेश देत २९ जानेवारीला रविवारी जुळ्या शहरातून काढण्यात आलेल्या सायकल रॅलीला शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी रॅलीत सहभागी दोन विद्यार्थ्यांना सायकली प्रदान करण्यात आल्यात.बाजार समितीतून निघालेल्या या रॅलीला उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी ठाणेदार किरण वानखडे, वाहतूक निरीक्षक एस.एस.कन्नाके, रूपेश ढेपे, जेसीआय अध्यक्ष सुशील श्रीवास्तव, संकल्प सेवा समिती अध्यक्ष विजय वर्मा, अचलपूर वकील संघाचे अध्यक्ष तरूण शेंडे, बालाजी मॉर्निंग ग्रुपचे महेश लुल्ला, आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेचे योगेश खानझोडे, दीपक हिंगणीकर, शंकर बारखडे, शारीरिक शिक्षक संघटनेचे प्रदीप खडके, हरिश्चंद्र मुगल, बाजार समिती संचालक पोपट घांडेराव आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जितेंद्र रोडे, संचालन प्रदीप खडके तर आभार प्रदर्शन नरेंद्र जावरे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
सायकल रॅलीला जुळ्या शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Updated: February 2, 2017 00:11 IST