शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

जगातील स्पायडर संशोधकांनी संशोधनासाठी एकत्र यावे

By admin | Updated: November 19, 2015 00:48 IST

जगात स्पायडर (कोळी) वर खूप संशोधन झाले असून अजून बरेच संशोधन बाकी आहे

जोसेफ के.एच. कोह : दिलखुलास चर्चेतून दिली माहिती अमरावती : जगात स्पायडर (कोळी) वर खूप संशोधन झाले असून अजून बरेच संशोधन बाकी आहे. जगात विखुरलेल्या स्पायडरच्या संशोधकांनी एकत्र येऊन संशोधन करावे, असे प्रतिपादन एशियन सोसायटी अ‍ॅरेकोनोलॉजीचे नवनियुक्त अध्यक्ष जोसेफ के.एच. कोह (सिंगापूर) यांनी केले. ते खास ‘लोकमत’ ला मुलाखत देताना बोलत होते. हाय कमिशन सिंगापूर व आॅस्ट्रेलिया मधून सेवानिवृत्त झाल्यानंतर जोसेफ स्पायडरवर संशोधन करीत आहेत. ते पुढे म्हणाले, मला भारतात येऊन खूप आनंद झाला. येथे संस्कार व संस्कृती जपणारे लोक आहेत. ही तिसरी एशियन स्पायडर परिषद स्पायडरच्या नव्या अभ्यासकांना वरदान ठरली आहे. विद्यार्थ्यांना एकाचवेळी जगातील एवढ्या संशोधकांना भेटता आले. त्यांच्याशी संवाद साधता आला. आपले संशोधन आपल्या पुरतेच सिमित न ठेवता ते सर्व अभ्यासकांपुढे मांडता आले. यामुळे नवीन पिढीसाठी त्याचा खऱ्या अर्थाने उपयोग झाला पाहिजे, असेही ते म्हणाले. भारतात अतिथींचा आदर सन्मान करण्यात येतो. अमरावती शहर मला आवडले असून जे.डी. सांगळूदकर महाविद्यालयाने ग्रामीणमधून ही परिषद आयोजित केली. त्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्य संयोगिता देशमुख व स्पायडर संशोधक अतुल बोडखे यांचे विशेष कौतुक केले. यावेळी प्राचार्य संयोगिता देशमुख, डॉ. पारस्कर, अतुल बोडखे उपस्थित होते. ही आंतरराष्ट्रीय स्पायडर परिषद अनेक संशोधकांसाठी मोठी उपलब्धी ठरणार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना आवर्जून सांगितले. शहराचे कौतुक करताना येथील आतिथ्याचे कौतुक केले. आंतरराष्ट्रीय परिषदेत जोसेफ यांची निवडअमरावती येथे आयोजित तिसरी आंतरराष्ट्रीय परिषदेत एशियन सोसायटी आॅफ अ‍ॅरेकोनोलॉजीच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी सिंगापूर येथील संशोधक जोसेफ के.एच. कोह यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष ओनो यांनी त्यांची सूत्रे जोसेफ यांच्या हाती दिली.