शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

२० रुपये शुल्कासाठी चारशे रुपये खर्च

By admin | Updated: June 17, 2017 00:08 IST

२० रुपये शुल्क भरण्यासाठी ४०० रुपये खर्च, हे वाचून थोडे बुचकळ्यात पडणारच. मात्र. हे खरे आहे.

अमरावती विद्यापीठाचा अजब कारभार : सिनेट निवडणुकीसाठी आॅनलाईन पदवी नोंदणी लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : २० रुपये शुल्क भरण्यासाठी ४०० रुपये खर्च, हे वाचून थोडे बुचकळ्यात पडणारच. मात्र. हे खरे आहे. यंदा संत गाडगेबाबा विद्यापीठाने सिनेट निवडणुकीसाठी विद्यार्थ्यांची आॅनलाईन पदवी नोंदणी आरंभली आहे. त्याकरिता लागणारे २० रुपये शुल्क रोखीने अथवा डीडीद्वारे पाठवावे लागतील, असा नवा फतवा जारी केला आहे. त्यामुळे रोख २० रुपये शुल्क देण्यासाठी विद्यार्थ्यांना चारशे, पाचशे रुपये खर्च करून विद्यापीठ गाठावे लागणार आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यान्वये येत्या आॅगस्टनंतर विद्यार्थी परिषदांच्या निवडणुकांचे बिगूल वाजणार आहे. त्याकरिता सिनेट सदस्य निवडणुकीसाठी महाविद्यालयस्तरावर विद्यार्थ्यांची पदवी मतदार आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया राबविली जात आहे. पदवी मतदार नोंदणी शुल्क रोखीने घेतले जात असल्याने त्यासाठी संबंधित विद्यार्थ्याला विद्यापीठात यावे लागत आहे. मतदार नोंदणी ही आॅनलाईन असताना शुल्क रोखीने या विद्यापीठाच्या अजब कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. कें द्र सरकारने कॅशलेस व्यवहाराची कास धरली असताना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पेमेंट गेट-वे प्रणाली अद्यापही लागू केली नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. यंदा पदवी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेशाच्यावेळी आॅनलाईन मतदार नोंदणी केली जात आहे. ही प्रक्रिया आॅनलाईन असली तरी मतदार नोंदणीसाठी २० शुल्क विद्यार्थ्याला विद्यापीठात प्रत्यक्ष भरायचे आहे. विद्यापीठात येणे शक्य नसल्यास २० रुपये शुल्काची रक्कम डीडीद्वारे पाठवावी, अशा सूचना आहेत. त्यामुळे अकोला, यवतमाळ, वाशिम किंवा बुलडाणा येथील विद्यार्थ्यांना आॅनलाईन पदवी मतदार नोंदणीचे २० रुपये शुल्क अदा करण्यासाठी पाचशे रुपये खर्च करावे लागेल. पदवी मतदार नोंदणी ही आॅनलाईन सुरू असताना शुल्काची भानगड रोखीने का? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. बुधवार १४ जूनपर्यंत ६५० विद्यार्थ्यांची आॅनलाईन पदवी मतदार नोंदणी झाल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून मिळाली आहे.‘पेमेंट गेट वे’ प्रणाली अडकली करारात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कॅशलेस आणि पारदर्शक कारभार व्हावा, यासाठी पेमेंट गेट वे प्रणाली सुरु करणे ही काळाची गरज आहे. मात्र ही सुविधा कोणत्या यंत्रणेमार्फत विद्यापीठात राबवावी, याविषयी आजही एकमत झाले नाही. येत्या २० जून रोजी व्यवस्थापन परिषदेच्या सभेत याविषयांवर मंथन होईल, असे संकेत आहेत. पेंमेट गेट वे प्रणाली सुरु झाल्यास विद्यार्थ्यांना व्यवहार आॅनलाईन करता येणे सुकर होईल, हे वास्तव आहे. परंतु विद्यापीठात पेंमेंट गेट वे प्रणाली सुरु करण्यासाठी ती करारबद्ध व्हायची असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.