गतवर्षी शेतकऱ्यांनी अल्प प्रमाणात तीळ व मूग या पिकांची लागवड केली होती. त्यांना कमी खर्चात उन्हाळ्यात बऱ्यापैकी उत्पादन झाल्याने यावर्षीही अनेक शेतकऱ्यांनी हेच पीक पेरले आहे. या पिकांच्या मशागतीला वेग आला आहे. साधारणत: मजूर सकाळी ६ वाजता शेतामध्ये काम करण्यासाठी जातात व एक वाजेपर्यंत घरी परततात. कावली, वसाड परिसरात दाभाडा, चिंचपूर, अशोकनगर, गुंजी, पिंपळखुटा, वाठोडा, जळगाव, गव्हा निपाणी, शिदोडी या गावांत मोठ्या प्रमाणात तीळ व मुगाची लागवड केली असल्याचे दिसून येत आहे.
शिवारात निंदण-खुरपणीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:13 IST