गजानन मोहोड अमरावतीतालुका मुख्यालयी ग्रामपंचायत असलेल्या ठिकाणी ‘क’ दर्जाची नगरपंचायत स्थापनेचा शासननिर्णय मागील वर्षी झाला. त्यानुसार जिल्ह्यात चार तालुक्यांच्या मुख्यालयी नगरपंचायती होणार आहेत. शासनस्तरावर याविषयी हालचालींना वेग आला आहे. विभागातील काही तालुक्यांत या प्रक्रियेला गती आली आहे. नगरपंचायतीचे क्षेत्र नागरी होत असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे पद रद्द होणार आहे. पंचायत अधिनियमानुसार नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्ह्यात ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम घोषित होऊ शकतो, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. जिल्ह्यात तिवसा, भातकुली, नांदगाव खंडेश्वर व धारणी तालुक्यांच्या मुख्यालयी ग्रामपंचायतऐवजी नगरपंचायती स्थापित होणार आहेत. नगरपंचायतींची घोषणा यापूर्वीच्या शासनाने केली होती. त्यानंतर नवीन शासन आले. त्यानंतर ही प्रक्रिया मंदावली. प्रभागाच्या संख्येत होणार वाढजिल्ह्यात ज्या तालुक्यांत नगरपंचायती होणार आहेत त्या ग्रामपंचायतींमध्ये ६ प्रभाग व १७ सदस्य संख्या आहे. नगरपंचायतीने सदस्य संख्या वाढणार असल्याने प्रभागाची संख्याही वाढणार आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात लाडू फुटत आहे.गुडघ्याला बाशिंग लावून तयारया ग्रामपंचायतींची निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याविषयी काही राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. काहींनी चुप्पी साधली आहे. एकंदरीत शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत हे राज्यकीय पक्ष गुंतले आहेत.
नगरपंचायत निर्मिती प्रक्रियेला वेग
By admin | Updated: February 28, 2015 00:32 IST