शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांच्या तंबीनंतर कर्जवाटपाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 23:34 IST

यंदाच्या खरीप हंगामाला सुरूवात झाली असतांना बँकानी कर्जवाटपाला सुरूवातच केली नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब गंभीरतेने घेतली. आठवड्यात दोन वेळा आढावा घेण्यात येत असल्याने आता कर्जवाटपाला गती प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्दे११ सहायक निबंधकांना नोटीस : २७ हजार शेतकऱ्यांना २८६ कोटींचे पीककर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामाला सुरूवात झाली असतांना बँकानी कर्जवाटपाला सुरूवातच केली नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब गंभीरतेने घेतली. आठवड्यात दोन वेळा आढावा घेण्यात येत असल्याने आता कर्जवाटपाला गती प्राप्त झाली आहे.यंदाच्या हंगामासाठी जिल्ह्यात खरीप कर्जवाटपाचे लक्ष्यांक १,६३० कोटींचे आहे. यामध्ये व्यावसायिक बँकांना १०९६ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असतांना २२ जूनपर्यत १५ हजार ७७७ शेतकऱ्यांना १८५.१७ कोटींचे वाटप करण्यात आले. ही टक्केवारी १७ अशी आहे. ग्रामीण बँकांना १४ कोटींचा लक्ष्यांक असताना २३९ शेतकºयांना २.३० कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. ही टक्केवारी १६ अशी आहे. जिल्हा बँंकेला ५२० कोटींचा लक्ष्यांक असतांना ११,३४५ शेतकऱ्यांना ९८ कोटी ८९ लाकांचे कर्जवाटप करण्यात आले. ही टक्केवारी १९ अशी आहे.जिल्ह्यातील थकबाकीदार १ लाख २१ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. तसेच ५० हजारांवर शेतकरी नियमित खातेदार आहेत व २० हजारांवर शेतकऱ्यांनी प्रोत्साहन, ओटीएस योजनेतंर्गत कर्जाचा भरणा केलेला आहे. असे एकूण किमान दोन लाख शेतकरी कर्ज मिळण्यास पात्र आहेत. मात्र बँकांचे उंबरठे झिजवित असतांना त्यांना माघारी पाठविण्यात येत आहे. यंदाच्या खरिपासाठी १ एप्रिलपासून कर्जवाटपास सुरूवात झाली. मात्र दोन महिण्यात तीन टक्केच कर्जवाटप झाल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीरतेने घेतली. अनावश्यक कागदपत्रे मागवून बँका शेतकºयांना त्रास देत असल्याने कर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांची निश्चिती केली व दर आठवड्यात दोन वेळा कर्ज वाटपाचा आढावा घेतला जात असल्याने आता कर्जवाटपास गती आलेली आहे.-तर प्रशासकीय कारवाई, नोटीस जारीभातकुली, चिखलदरा व धारणी वगळता उर्वरित तालुक्यांमधील जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये कर्जवाटप माघारल्याने ११ तालुक्यातील सहाय्यक निबंधकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस दिली आहे. लक्ष्यांक पुर्तीसाठी नियोजन करून गरजू शेतकºयांना तत्काळ कर्जवाटप पुर्ण करावे. कर्जवाटपासंदर्भात कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास वैतयक्तिक दोषी धरण्यात येऊन प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असी तंबी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.पीक कर्जवाटपासाठी आता ग्रामस्तरीय समितीविहित मुदतीत लक्ष्यांकपूर्ती व्हावी, यासाठी सर्व गावांमध्ये चार सदस्यीय ग्रामस्तर समिती गठीत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या समितीचे अध्यक्ष तलाठी व कृषी सहाय्यक सदस्य सचिव राहणार आहे. या समितीमध्ये ग्रामसेवक व सबंधित सोसायटींचे गटसचिव देखील राहणार आहे. ग्रामस्तरावरील या समितीने पीककर्ज मागणी अर्ज प्रत्येक शेतकऱ्यांपर्यत पोहचण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे.