शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

खासगीत कापूस @ ५१००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 22:31 IST

यंदाच्या हंगामात प्रथमच या दोन दिवसांत कापसासह सोयाबीनचे दरात वाढ झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देयंदाचा सर्वाधिक दर : रूईची दरवाढ, मागणी वाढली

आॅनलाईन लोकमतअमरावती : यंदाच्या हंगामात प्रथमच या दोन दिवसांत कापसासह सोयाबीनचे दरात वाढ झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. कापसाच्य दरात ४०० ते ५०० रूपये प्रतिक्विंटल, तर सोयाबीनमध्येही २०० ते ३०० रूपयांपर्यंत वाढ झालीे आहे. खरेदी केंद्रावर आॅनलाइन नोंदणीसह अटी, शर्तींचा भडीमार असल्याने शेतकºयांचा कल खासगी व्यापाºयांकडे अधिक दिसत आहे.खासगी बाजारात शनिवारी कापसाची ४७०० ते ५१०० रूपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आली. यंदाच्या हंगामात गुलाबी बोंड अळीने सरासरी उत्पन्नात ५० ते ६० टक्क्यांनी घट येणार आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात रूईचे दर वाढल्याने भाववाढ झालेली आहे.जिल्ह्यात सध्या नाफेडची सहा, तर सीसीआयची दोन, अशा आठ केंद्रांवर आधारभूत किमतीने कापसाची खरेदी सुरू आहे.मात्र, केंद्र सुरू झाल्यापासूनच खासगीत कापसाला अधिक दर असल्याने केंद्र ओस पडली आहेत. या सर्व केंद्रांवर गेल्या दोन महिण्यात केवळ २ हजार क्विंटल खरेदी करण्यात आली. त्यातुलनेत व्यापाºयांनी सध्यास्थितीत एक लाख ३० हजारांवर क्विंटल कापसाची खरेदी केली आहे.बाजार समितीमध्ये शनिवारी सोयाबीन २४०० ते २९०० रूपये प्रति क्विंटल विकल्या गेले, वास्तविकता २०० रूपये बोनससह सोयाबीनची अधारभूत किंमत ३०५० रूपये आहे. मात्र, जिल्ह्यातील १० नाफेड केंद्रांवर नॉन एफएक्यू सोयाबीन नाकरल्या जात आहे. आता आर्द्रता नसल्यामुळे स्थानिक बाजारात व्यापाºयांनीदेखील दरवाढ केली. यामागे अनेक कारणे असली तरी खासगी खरेदीत प्रथमच दरवाढ झालेली आहे. यंदा मळणीच्या हंगामात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सोयाबीन डागी झाले. नॉन एफएक्यू प्रतवारी असल्याने नाफेडच्या केंद्रांवर नाकारले जात असल्याने व्यापाºयांनीही बेभाव खरेदी केली. आता मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात डीओसीची मागणी वाढल्याने दरात वाढ झाली व्याºयांनी सांगितले.डीओसी, रूईचे आंतरराष्ट्रीय दरात वाढयंदा कापसाचे उत्पादनात ४० टक्क्यांनी कमी येणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात ३.५६ ची गाठ सध्या ४ हजार रूपयांपर्यंत मागणी आहे. यामुळे कापसाची दरवाढ झाली. सोयाबीनमध्ये सद्यस्थितीत आर्द्रता नाही व डीओसीची मागणी वाढल्याने सोयाबीनच्या दरात वाढ झाली. मात्र, पुढील आठवड्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर सौदे कमी होणार असल्याने किमान आठ ते दहा दिवस १०० ते १५० रूपयांनी भाव कमी होऊ शकतात, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.सध्या स्थानिक बाजारात हरभरा, तुरीला उठाव नाही. सोयाबीनची आर्द्रता कमी झालेली आहे व डीओसीची मागणी वाढल्याने सोयाबीनची दरवाढ झाली. कपाशीचे उत्पादनात कमी येत आहे व रूईची दरवाढ झाल्याने कापसातही तेजी आली.- अमर बांबल, अडते, व्यापारी