शिक्षण विभागाचा उपक्रम
नांदगाव खंडेश्वर : कोणत्याही मुलाचे शिक्षण थांबू नये, यासाठी शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी २५ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत तालुक्यात पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत विशेष शोधमोहीम सुरू आहे.
मोहिमेद्वारे गावागावांतील कुटुंबातील तीन ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध स्तरांवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या मोहिमेद्वारे अनियमित व स्थलांतरित विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून घेण्यात येणार आहे. या शोधमोहिमेसाठी तहसीलदार यादव, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना ठाकरे, पंचायत समिती विभागातील केंद्रप्रमुख प्रवीण मेहरे, विलास राठोड, राजू खिराडे, हरिश्चंद्र गोहत्रे व तालुक्यातील शाळांचे मुख्याध्यापक व प्रगणक पर्श्रम घेत आहेत.