शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारच्या विशेष सभेत गदारोळ

By admin | Updated: April 26, 2016 00:09 IST

जिल्हा परिषदेत जिल्हाधिकारी यांचे कडून प्राप्त जलयुक्त शिवार अंतर्गत निवडण्यात आलेल्या गांवाची माहिती व नियोजन करण्यासाठी सोमवारी बोलविण्यात आलेली....

जिल्हा परिषद : विरोधकांनी विचारला जुन्या कामाचा लेखाजोखाअमरावती : जिल्हा परिषदेत जिल्हाधिकारी यांचे कडून प्राप्त जलयुक्त शिवार अंतर्गत निवडण्यात आलेल्या गांवाची माहिती व नियोजन करण्यासाठी सोमवारी बोलविण्यात आलेली विशेष सर्वसाधारण सभा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभेत गदारोळ केल्याने ही सभा गुंडाळण्यात आली. त्यामुळे मूळ विषयावर कुठलीही चर्चा न होताच ७६ कोटीच्या कामाची माहिती व नियोजन हे प्रशासनापुरते मर्यादित राहण्याचा प्रसंग अनुभवयाला मिळाला.जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनाकडे सन २०१५-१६ करिता जि.प. सिंचन विभागाने जिल्हाभरातील ३०९ कामे प्रस्तावीत केली होती. त्यापैकी २५३ कामे जिल्हाधिकारी यांनी मंजूर करून याबाबतची यादी सिंचन विभागाकडे पाठविली आहे. यासाठी सुमारे ७६ कोटी रूपयांचा निधीही मंजूर केला आहे. एवढ्या मोठ्या रक्कमेची कामे मंजूर केल्यामुळे या यादीत समाविष्ट गावातील सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती आणि जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्य यांच्याशी चर्चा क रून कामांचे नियोजन करण्यात आले. मात्र यामध्ये जी गावे सुटली त्या गावांचा समावेश करण्यासाठी जिल्हा परिषदेत ही सभा बोलवण्यात आली. मात्र यावर चर्चा करण्यापूर्वी जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षाचे सदस्य सुधीर सूर्यवंशी , सुरेखा ठाकरे, रवींद्र मुंदे, अभिजित ढेपे, आदींनी सभेला मुख्यकार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, कृषी विभागाचे अधिकारी हजर नसल्याने आमच्या प्रश्नांचे उत्तर कोण देईल, असा मुद्दा या सदस्यांनी सभेत उपस्थित करीत सभागृहात चांगलाच गोंधळ केला. विकासाच्या मुद्यावर चर्चाच नाहीअमरावती : सभेत विषय सुचिवर कुठलीही चर्चा न करताच गदारोळातच अध्यक्षांनी ही सभा आटोपली असल्याचे जाहीत करत सदस्यांनी जलयुक्त शिवार अभियानात सदस्यांनी सुटलेल्या गावांच्या संदर्भात पत्र देण्याचे आवाहन सदस्यांना केले. एकंदरीत सभेत विकासाच्या मुद्यावर चर्चा होवू शकली नाही.सभेला अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, सरिता मकेश्र्वर, अरूणा गोरले, सदस्य मोहन सिंगवी, प्रविण घुईखेडकर, मोहन पाटील, उमेश केने, ममता भांबुरकर, विनोद टेकाडे व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील, डेप्युटी सिईओ प्रकाश तट्टे, मुख्यलेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.