शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात २२ गावांवर विशेष लक्ष

By admin | Updated: June 1, 2017 00:11 IST

पावसाळ्यामध्ये सतर्क राहण्याच्या दृष्टिने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

सतर्क राहण्याच्या सूचना : साथीचा उद्रेक झाल्यास दोषींवर कारवाईजितेंद्र दखने । लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पावसाळ्यामध्ये सतर्क राहण्याच्या दृष्टिने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. मागील तीन वर्षात साथीचा उद्रेक झालेल्या गावांसह जिल्ह्यातील एकूण २२ गावांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.पावसाळयाच्या दिवसात नैसर्गिक आपत्ती व पूरपस्थितीमध्ये कोणतीही साथ उद्भवू नये, यासाठी आरोग्य विभागाने प्रतिबंधक उपाययोजनांची आखणी केली आहे. गत तीन वर्षात डेंग्यू, चिकनगुनिया, गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, लेप्टोस्पायरोसिन आदी साथींचा उद्रेक झालेल्या गावांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. पावसाळयातील संभाव्य पूरग्रस्त भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रावर तसेच तालुकास्तर व जिल्हास्तरावर २४ तास वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच या गावांना आरोग्य कर्मचारी, पर्यवेक्षकांनी वेळोवेळी भेट देऊन नियमित रोगविषयक सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतींनाही नियमित पाणी शुध्दीकरण जलजन्य साथीचा आजार, उपचाराबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. घरोघरी मेडिक्लोरचे वाटप तसेच प्रत्येक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालय पूर्व परवानगी शिवाय सोडू नये, अशा कडक सूचना आरोग्य अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.जोखीमग्रस्त गावेतांगडा, चोपन, कावळा, झिरी, किन्हाखेडा, कुड, धोकड, सोनाबर्डी, डोलार, परसोली, पळळसकुंडी, डोमी, कुही, रूईपठार, कुटीदा, सुमिता, कारंजखेडा, मारिता, राक्षा, अढाव, रेहटयाखेडा, बिच्छूखेडा, माडीझडप आदी गावे जोखीमग्रस्त आहेत.असे आहे नियोजनवैद्यकीय पथकाची स्थापना, जिल्हा परिषद आरोग्य विभाग सतर्क, जनतेला आरोग्य शिक्षण देण्याच्या सूचना, जिल्हास्तरावर साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन,साथ नियंत्रण अधिकारी नियुक्त, घरोघरी मेडिक्लोर वाटप, २४ तास वैद्यकीय पथके कार्यरत राहणार, प्राथमिक आरोग्य केंद्रावर तसेच तालुकास्तर व जिल्हास्तरावर २४ तास वैद्यकीय पथक ाची स्थापना, जिल्ह्यातील ५६ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ३३३ उपकेंद्रांना आरोग्य विभागाकडून सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. तसेच प्रत्येक आरोग्य केंद्रात औषधांचा पुरेसा साठा ठेवण्यात येणार आहे.पावसाळ्याचे दिवस तोंडावर असल्यामुळे आरोग्य विभागाने संभाव्य साथरोगाचा उद्रेक रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहे. संबंधितांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.- नितीन भालेराव, जिल्हा आरोग्य अधिकारी