शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सभापतींनी खडसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 22:53 IST

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अखत्यारितील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र्रातील कामकाजाची अनावस्था व पदाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या जिल्ह्यातील १४ तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना शुक्रवारी सभेदरम्यान आरोग्य सभापती बळवंत वानखडे यांनी खडसावले. सभापतींचा संताप पाहून सभेला उपस्थित अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती.

ठळक मुद्देआरोग्य समितीत संताप : जिल्हा परिषदेत कामचुकारांची खरडपट्टी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अखत्यारितील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र्रातील कामकाजाची अनावस्था व पदाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या जिल्ह्यातील १४ तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना शुक्रवारी सभेदरम्यान आरोग्य सभापती बळवंत वानखडे यांनी खडसावले. सभापतींचा संताप पाहून सभेला उपस्थित अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती.जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा १९ जानेवारी रोजी सभापतींच्या दालनात घेण्यात आली. ग्रामीण भागातील ५६ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे आरोग्य केंद्र आयएसओ करण्याच्या दृष्टीने तालुका वैद्यकीय अधिकाºयांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या तालुक्यातील एक प्राथमिक आरोग्य केंद्र आयएसओ करण्याच्या दृष्ट्रीने नियोजनबद्ध कामे करण्याचे सभापती बळवंत वानखडे यांनी सूचित केले होते. मात्र आरोग्य सभापतींनी जिल्हा आरोग्य अधिकाºयांनमार्फत दिलेल्या लेखी पत्राचे अनुषंगाने १४ ही तालुका वैद्यकीय अधिकाºयांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे सभापतींनी सर्व तालुका वैद्यकीय अधिकाºयांना खडेबोल सुनाणावत जाब विचारला. यासोबतच सभेत ग्रामीण भागात रक्तदान शिबिर, आरोग्य केंद्रातील आवश्यक सोई सुविधा व त्यावर उपाययोजनेसाठी सूचना दिली होती. मात्र कार्यवाही झाली नाही. गोवर, रूबेला लसीकरणाचे उद्दिष्टही साध्य केले नाही. त्यामुळे आरोग्य समितीत या विषयावर टीएमओंना कधी नव्हे खडेबोल सुनावले. आरोग्य सभापती व समितीच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात नसल्याने जिल्हा परिषद आरोग्य समिती सदस्यांनीही जिल्हा आरोग्य अधिकाºयांकडे नाराजी व्यक्त करीत कामकाजात सुधारणा करण्याचे निर्देश दिले. यावेळी बोगस डॉक्टरांवर कारवाई होत नसल्याचा मुद्दा, प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्वच्छता, सोई सुविधा व अन्य विषयावरही सभेत वादळी चर्चा झाली. कामकाजात तातडीने सुधारणा करा अन्यथा जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना अचानक दिलेल्या भेटी सुधारणा न दिल्यास दोषीवर कारवाई करण्याचा इशारा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.यावेळी सभेला सभापती बळवंत वानखडे, सदस्य सुखदेव पवार, गणेश सोळंके, सीमा घाडगे व जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश असोले, मनीषा सूर्यवंशी व अन्य आरोग्य अधिकारी उपस्थित होते.चिंचोना येथील मुद्दा गाजलाअंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोना येथे किडनी आजाराने अनेक नागरिक आजारी पडलेत. तेथील नागरिकांना आरोग्याच्या पुरेशा सोई व आजार मुक्तीसाठी आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष देणे अपेक्षित होते. मात्र, यात आरोग्य विभागाने अपेक्षित अशा उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे चिंचोना गावातील किडनी आजाराने त्रस्त रूग्णांना तातडीने आवश्यक सुविधा पुरविण्याचे निर्देश आरोग्य समितीने संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.