शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणामुळे चिमण्यांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 00:16 IST

धुळीपासून चक्क परमाणू लहरी आणि कीटकनाशकाच्या प्रदूषणामुळे पशुपक्ष्यांवरसुध्दा विपरीत परिणाम होत आहे.

भ्रमणध्वनीच्या परमाणू लहरी : पशुपक्ष्यांसाठी कृत्रिम निवारे हवेवरूड : धुळीपासून चक्क परमाणू लहरी आणि कीटकनाशकाच्या प्रदूषणामुळे पशुपक्ष्यांवरसुध्दा विपरीत परिणाम होत आहे.पूर्वी पहाटेपासून तर सायंकाळपर्यंत सतत चालणारा चिमण्यांचा चिवचिवाट कायमचा बंद झाला. शहरातील सिमेंटच्या जंगलामुळे पक्ष्यांचे निवारेसुध्दा लोप पावले. परंतु चिमण्यापाखरांसोबत नातीगोती जपणाऱ्यांनी मात्र चिमण्यांचा सहवास मिळावा म्हणून पक्षीप्रेमी नागरिक घरांच्या गच्चीवर कृत्रिम घरटे लावण्याचा उपक्रम राबवतात. पशुपक्षी घरट्यातून बाहेर येत एकच कलह होत होता. तेव्हा पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे महिला मंडळी पहाटे सडा सारवण करीत होत्या. परंतु आता सूर्यवशंचा जमाना आला. कुणालाही सडा सारवण करण्याची गरज वाटत नाही. जुन्या काळची भूपाळीसुध्दा काळाच्या पडद्याआड गेली आहे. विज्ञानाने सर्वच क्षेत्रात प्रगती करून मानवाला ऐहिक सुखाच्या विळख्यात टाकले आहे. परंतु तेवढेच दुष्परिणामसुध्दा वाढले आहेत. मानवी जीवन आजाराने वेढले गेले. विकासाची प्रगती मानवी जीवनाला अडसर ठरत आहे. यामुळे मानवाला अनेक आजारांनी ग्रासले आहे. निसर्गातील पशुपक्षीसुध्दा काळाच्या पडद्याआड जात आहे. जंगलात पिकावर होत असलेल्या अतिविषारी कीटकनाशकाच्या फवारणीमुळे पक्ष्यांचे खाद्य अळ्यासुध्दा नाहिशा झाल्याने पशुपक्ष्यावर उपासमारी येऊ लागली आहे. ग्रामीण भागात असणाऱ्या चिमण्या तर केवळ बोटावर मोजण्याइतक्या दिसून येतात. ‘कावळ्यांचे घर शेणाचे आणि चिमणीचे घर मेणाचे’ ही म्हणसुध्दा कालबाह्य झाली आहे. शहरी भागात सिमेंट रस्ते आणि मोठमोठ्या इमारतीमुळे शहरातील चिमण्यांचा चिवचिवाट नाहिसा झाला. पहाट कधी होते हे कळायला मार्ग नाही. कालांतराने येणाऱ्या पिढीला केवळ पुस्तकात चिमण्यांचे चित्र पाहून समाधान मानावे लागेल. पर्यावरणवाद्यांनी यावर चिंंतन करण्याची वेळ आली तर शासनाने याकरिता विशेष कायदा करणे गरजेचे झाले. भ्रमणध्वनीसुध्दा याला कारणीभूत ठरत असल्याचे पर्यावरणवाद्यांचे मत आहे. शहरातून तर चिमण्यांचा चिवचिवाट कायमचा बंद झाल्याने निसर्गवाद्यांना सतत चिंंता भेडसावू लागली आहे. याकरिता काही पक्षीप्रेमी, निसर्गप्रेमी घराच्या आजूबाजूला कृत्रिम घरटे आणि पाण्याची व्यवस्था करून चिमण्या पाखरांना निवारा देण्याचा प्रयत्न करीत असतात. चिमण्या-पाखरांवर परमाणू लहरीचा परिणाम होऊन चिमण्यांनी आता आपला मोर्चा निर्सर्गाच्या सान्निध्यात वळविला असल्याने शहरात चिमण्या नामशेष झाल्या आहे. (प्रतिनिधी)