शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

घातक अमरवेलीच्या विळख्यात सोयाबीन

By admin | Updated: August 4, 2015 00:14 IST

जिल्ह्यातील सोयाबीनसह द्विदल धान्यपिकावर मागील दोन ते तीन वर्षांपासून ‘अमरवेल’ ही परोपकारी वेल मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

शेती पिकावर संकट : रोपांच्या अन्नरसाचे शोषण, उत्पन्नात घटअमरावती : जिल्ह्यातील सोयाबीनसह द्विदल धान्यपिकावर मागील दोन ते तीन वर्षांपासून ‘अमरवेल’ ही परोपकारी वेल मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जवळपास सर्वच तालुक्यांत अमरवेलीचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात दिसून येतो. यामध्ये रोपाच्या अन्नरसाचे शोषण होत असल्याने सरासरी उत्पादनात घट येते. पूर्णपणे नियंत्रणात आणणे कठीण असणाऱ्या या वेलीच्या निर्मूलनासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे ३ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. यापैकी ३ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी ३० जुलैपर्यंत झाली आहे. यासोबतच तूर, मूग व उडीद यासारखी द्विदल पिकेही आहेत. या पिकावर ‘अमरवेल’ या घातक परोपजिवी तणाचा प्रादुर्भाव झाला आहे. जगभरात या अमरवेलीच्या १७० प्रजाती आढळून येतात. हे तण परोपजिवी असल्याने द्विदल पिकाप्रमाणेच, द्विदल तणावरदेखील त्यांचा जीवनचक्र पूर्ण करतात. बाल्यावस्थेत असताना ही वेल गुंडाळी करून दुसऱ्या वनस्पतीचे खोड तसेच पानावर चिकटते व जमिनीपासून विलग होते. त्यानंतर ती झाडावरील अन्नद्रव्ये सूक्ष्म दातासारख्या असणाऱ्या ‘होस्ट्ररिया’च्या सहाय्याने शोषूण घेतात. यामुळे प्रादुर्भावग्रस्त झाडाची वाढ खुंटते व उत्पादनात घट येते. अमरवेलीमुळे १०० टक्के नुकसान झाल्याचीही उदाहरणे आहेत. ‘अमरवेल’ या परोपजिवी तणाचे नियंत्रण करण्यासाठी जगात अजूनपर्यंत हमखास योजना अस्तित्वात नाही. या वेलीचा बंदोबस्त करणे जिकरीचे काम आहे. एकाच पद्धतीचा अवलंब न करता एकात्मिक तण व्यवस्थापनाद्वारे याचे नियंत्रण करणे अनिवार्य ठरते. अमरवेलीच्या यशस्वीपणे व्यवस्थापन करताना प्रादुर्भावग्रस्त भागातील शेतकरी बांधवांनी तसेच ज्या गावांमधील ग्रामपंचायतीद्वारे सामूहिकरित्या पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. या अमवेलीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविणे कठीण आहे. मात्र सामूहिक प्रयत्नांनी प्रतिबंध करूशकतो. शेतकऱ्यांनी प्रादेशिक संशोधन केंद्राद्वारा सुचविलेल्या उपाययोजनांसाठी सामाजिक जनजागृती होणे गरजेचे आहे. - राजेंद्र जाणे, कृषिशास्त्रज्ञ.अमरवेल या परोपजिवी वेलीमुळे पिकांची वाढ खुंटते. त्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होतो. याविषयी संशोधन होणे महत्त्वाचे आहे. कृषी विभागाचे कुठलेही धोरण यासंदर्भात नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. या परोपजिवी तणामुळे द्विदल शेतीपिकांचे जे नुकसान होते त्याची नुकसान भरपाई शासनाने द्यावी. - जहिरुद्दीन इनामदार, शेतकरी.