शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फुलोऱ्यावरील सोयाबीनची फुलगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 22:38 IST

खरिपात सर्वाधिक पेरणीक्षेत्र असलेला सोयाबीन आता फुलोºयावर आहे. चार वर्षांपासून दुष्काळाची झळ सोसलेल्या शेतकऱ्यांना आता कुठे दिलासा मिळाला. मात्र, दोन आठवड्यांपासून पावसाचा ताण असल्याने, फुलगळ होत आहे.

ठळक मुद्देउत्पादनात घट होण्याची भीती : बाष्परोधकाची फवारणी आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खरिपात सर्वाधिक पेरणीक्षेत्र असलेला सोयाबीन आता फुलोºयावर आहे. चार वर्षांपासून दुष्काळाची झळ सोसलेल्या शेतकऱ्यांना आता कुठे दिलासा मिळाला. मात्र, दोन आठवड्यांपासून पावसाचा ताण असल्याने, फुलगळ होत आहे. त्यामुळे सरासरी उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे.वास्तविक सोयाबीन हे मध्यप्रदेश येथील पीक. परंतु, या दशकात वऱ्हाडात खरिपाच्या कॅश क्रापची जागा घेतल्याने कपाशी माघारली. सोयाबीनला बाजारात वाढती मागणी आहे. पण आंतरराष्ट्रीय बाजारभावाचा यावर निश्चित फरक पडतो. गतवर्षी बोंडअळीने दोन लाख हेक्टरमधील कपाशी उद्धवस्त झाल्याने यंदा सोयाबीनची क्षेत्रवाढ झाली. यंदाच्या खरिपात साधारणत: दोन लाख ९३ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनचे पीक आहे. जिल्ह्यात यंदा ६ लाख ८० हजार हेक्टरमध्ये खरिपाची पेरणी झाल्याने एकूण क्षेत्राच्या ४५ टक्के सोयाबीन आहे. आतापर्यत सोयाबीनची वाढही चांगली झाली. १०० ते ११० दिवसांचे हे पीक ४५ दिवसांननंतर आता फुलोऱ्यावर येत आहे. या पार्श्वभूमीवर १५ दिवसांपासून पावसात खंड आहे. त्यातही ढगाळ वातावरणामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे फुलोराचे रुपांतर शेंगामध्ये होण्याऐवजी फुलगळ होण्याचा धोका अधिक आहे. शेंगा पकडल्याच तर त्यामधील दाणा बारीक राहण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकारात पिकाचे उत्पन्नात २५ ते ४० टक्के घट येण्याची शक्यता असल्याने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पावसाने पळविले आहे.फुलोºयावर अन् शेंगा भरताना पाऊस आवश्यकसोयाबीनचे पीक पावसाला अतिसंवेदनशील आहे. पीक फुलोºयावर असताना पावसाची आवश्यकता असते. अन्यथा फुलोर गळून पडतो. तसेच सोबीनच्या शेंगा पक्वहोण्याच्या कालावधीत पावसाची आवश्यकता आहे. अन्यथा शेंगा पोचट राहून दानादेखील बारीक पडतो. यामुळे पिकाच्या सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात तूट येते. संरक्षित सिंचनाची सुविधा असल्यास पाण्याची पाळी देणे गरजेचे असल्याचे कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले.अन्यथा नुकसान होण्याची शक्यताजिल्ह्यातील सोयाबीन सध्या फुलोऱ्यावर आहे. मात्र, पावसाचा खंड असल्याने पोटॅशियम नायट्रेट (१३:०:४५) याची १०० लिटर पाण्यात १ किलो अशी फवारणी आवश्यक आहे. हे बाष्परोधक व न्युट्रीएंटचे काम करीत असल्याने किमान १५ दिवस तरी पावसाचा ताण पीक सहन करू शकते, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कृषीशास्त्रज्ञ योगेश इंगळे यांनी सांगितले.