शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

सात लाख हेक्टरमध्ये पेरणी

By admin | Updated: May 10, 2015 00:41 IST

जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ७ लाख ८१ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य आहे. यापैकी ७ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्रात...

खरीप पेरणी २०१५-१६ : गतवर्षीच्या तुलनेत ३२ हजार हेक्टरने वाढगजानन मोहोड अमरावतीजिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ७ लाख ८१ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य आहे. यापैकी ७ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्रात यंदाच्या खरीप हंगामाची पेरणी होण्याची शक्यता आहे. गवतर्षी खरिपाचे ६ लाख ८२ हजार पेरणीक्षेत्र होते. त्या तुलनेत यंदा ३२ हजार हेक्टरची वाढ होत आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामात पेरणी कालावधीपासून दीड महिना पावसाने दडी मारली. त्यामुळे जुलै, आॅगस्ट महिन्यांपर्यंत पेरणी सुरू होती. या प्रतिकूल परिस्थितीमुळे ६ लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. यावर्षी कृषी विभागाव्दारा ७ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ४५ टक्के म्हणजेच ३ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र आले आहे. यामध्ये ४५ टक्के म्हणजेच ३ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र सोयाबीनचे आहे. यानंतर १ लाख ९६ हजार हेक्टरमध्ये कापूस, ९९ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात तूर, ३५ हजार हेक्टरमध्ये मूग, २० हजार हेक्टरमध्ये ज्वारी, ३ हजार ७०० हेक्टरमध्ये उडीद व १६ हजार ७५० हेक्टरमध्ये ईतर पिके राहणार आहेत. या हंगामातील प्रमुख पिकांकरिता गत ५ वर्षांतील पिकाने उच्चतम उत्पादकता प्रमाण मानून खरीप २०१५-१६ करिता ५ टक्के वाढ गृहित धरली आहे. असे राहणार तालुकानिहाय क्षेत्रयंदाच्या खरीप हंगामात ७,१४,००० हेक्टर क्षेत्रात पेरणी होणार आहे. यामध्ये अमरावती तालुका ५३,७६० हेक्टर, भातकुली ४६,६५०, नांदगाव ६६,४८०, तिवसा ४४,९७२, चांदूररेल्वे ४५,९५०, धामणगाव ५२,४१०, मोर्शी ६१,४००, वरुड ४२,६६८, चांदूरबाजार ५०,०३०, अचलपूर ४८,८००, अंजनगाव ८०,५६०, दर्यापूर ५५,५००, धारणी ४३,८००, चिखलदरा २२,९५० हेक्टर पेरणीक्षेत्र राहणार आहे. १३ हजार मेट्रिक टन खत उपलब्धकृषी विभागाव्दारा खरीप २०१५-१६ करिता १ लाख ४५ हजार मेट्रीक टन खताची मागणी नोंदविण्यात आली. यापैकी १ लाख १५ हजार ६०० मे.टन साठा मंजूर झाला आहे. त्यापैकी २५ एप्रिलपर्यंत ५ हजार ७५६ मे. टन खताचा पुरवठा झालेला आहे. गेल्या हंगामातील ७ हजार २२७ मे.टन साठा शिल्लक असल्याने जिल्ह्यात १२ हजार ९८३ मे. टन खत उपलब्ध आहे.