शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

चार लाख हेक्टरातील पेरण्या खोळंबल्या

By admin | Updated: July 6, 2017 00:19 IST

पेरणीसाठी आवश्यक दमदार पाऊस नसल्याने जिल्ह्यात खरीपाच्या चार लाख १३ हजार हेक्टर मधील पेरण्या खोळंबल्या आहेत.

चार तालुके माघारले : जिल्ह्यात खरिपाच्या ५७ टक्के पेरण्या बाकीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पेरणीसाठी आवश्यक दमदार पाऊस नसल्याने जिल्ह्यात खरीपाच्या चार लाख १३ हजार हेक्टर मधील पेरण्या खोळंबल्या आहेत. अद्याप ५७ टक्के क्षेत्रात पेरण्या बाकी आहेत. यात अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, भातकुली व दर्यापूर तालुके माघारले आहे. त्यामूळे तूर वगळता कमी कालावधीची कडधान्य बाद होणार आहेत.यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीपासुनच पावसाची दडी आहे. रोहीणी, मृग व आर्द्रा नक्षत्र कोरडे गेले आहेत. यंदाच्या हंगामात अद्यापही मान्सून सक्रिय झालाच नाही. जिल्हयात जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत केवळ ६१ टक्के पाऊस पडला. तोही प्रत्येक तालुक्यात कमी-जास्त असल्यामुळे १० तालुक्यात सरासरी ४० टक्कयाच्या वर पेरण्या झाल्यात. तर चार तालुके माघारले. या तालुक्यामध्ये २० टक्कयाच्या आतच पेरण्या आहेत.जिल्ह्यात यंदाच्या खरीपासाठी सात लाख २८ हजार ११२ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. त्या तुलनेत सद्यस्थितीत तीन लाख १४ हजार ६१३ हेक्टरमध्ये पेरण्या आटोपल्या आहेत. ही ४३.२ टक्केवारी आहे. यामध्ये सोयाबीनसाठी तीन लाख २३ हजार ३८४ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असताना एक लाख ३६ हजार ६८५ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. ही ४२ टककेवारी आहे. कपाशीसाठी एक लाख ९३ हजार २६१ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असताना एक लाख ६ हजार ४२५ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. ही ५५ टक्केवारी आहे. तर तुरीसाठी एक लाख १४ हजार १९५ प्रसतावित क्षेत्राच्या तुलनेत ४५ हजार ३११ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. ही ३९.७ टक्केवारी आहे. अन्य पिकांमध्ये धान पाच हजार ३८० हेक्टर, खरीप ज्वारी नऊ हजार ११९ हेक्टर, बाजरी ८५ हेक्टर, मका तीन हजार ५४४ हेक्टर, मूग चार हजार८३२ हेक्टर, उडीद तीन हजार १४५ हेक्टर, भुईमूग ६३६ हेक्टर व तिळाची ३७ हेक्टर मध्ये पेरणी झाली आहे. पेरणीचा अवधी निघून जात असल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.तुरळक ठिकाणी पाऊसजिल्ह्यासह विदर्भ व मध्य महाराष्टात येत्या २४ तासात काही ठिकाणी वादळ, वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे.तसेच कोकण विभागात देखील बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. बुधवारपासून पुनर्वसू नक्षत्र सुरू झाले आहे. या नक्षत्राचे वाहन कोल्हा असल्याने पाऊस बेभरवश्याचा राहील,असे शेतकऱ्यांचे मत आहे.मूग, उडदाचे क्षेत्र होत आहे बादजिल्ह्यात यंदाच्या हंगामात मुगासाठी ४४,३३६ हेक्टर सरासरी क्षेत्र असताना सद्यस्थितीत केवळ ४,८३२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. त्यातुलनेत उडिदासाठी ५,६४४ हेक्टर क्षेत्र असताना ३,१४५ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. पावसाने दडी मारल्याने ६० दिवसांचे हे पीक बाद होऊन सोयाबीन व कपाशीच्या क्षेत्रात रूपांतरीत होत आहे.