शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कृषी महोत्सवाचा ‘आत्मा’च हरविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:30 IST

शेतकऱ्यांना प्रगत कृषीतंत्रज्ञानाचा लाभ व्हावा यासाठी आयोजित पाच दिवसीत कृषी महोत्सवाचा जिल्ह्यात प्रचार, प्रसार न झाल्याने शेतकऱ्यांपर्यत हा महोत्सव पोहोचलाच नाही, त्यामुळे कार्यक्रमात खुुर्च्या रिकाम्या अशी नामुष्की ‘आत्मा’ विभागावर ओढावली, शेतकऱ्यांनीच पाठ फिरवील्यामुळे २० लाखांचा खर्च कुणासाठी, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

ठळक मुद्देढिसाळ नियोजन : शेतकऱ्यांची पाठ, २० लाखांचा खर्च कुणासाठी ?

आॅनलाईन लोकमतअमरावती- शेतकऱ्यांना प्रगत कृषीतंत्रज्ञानाचा लाभ व्हावा यासाठी आयोजित पाच दिवसीत कृषी महोत्सवाचा जिल्ह्यात प्रचार, प्रसार न झाल्याने शेतकऱ्यांपर्यत हा महोत्सव पोहोचलाच नाही, त्यामुळे कार्यक्रमात खुुर्च्या रिकाम्या अशी नामुष्की ‘आत्मा’ विभागावर ओढावली, शेतकऱ्यांनीच पाठ फिरवील्यामुळे २० लाखांचा खर्च कुणासाठी, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.ज्यांच्यासाठी लाखो रूपयांचा खर्च सुरू आहे, त्या शेतकऱ्यांचीच या महोत्सवात नगण्य स्थिती असल्याने, हा महोत्सव शेतकºयांसाठी की कृषी विभागाचे गोडवे गाण्यासाठी असा सवाल विचारल्या जात आहे. सलग चार वर्षाच्या दुष्काळ, नैसगीक आपत्ती व लहरी पाऊस यामुळे जिल्ह्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे सत्र थांबलेले नाही. अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांना पर्यायी पिकांसंदर्भात मार्गदर्शन करणे, शेतकरी व प्रयोगशील शेतकऱ्यांच्या अनुभवाचे बोल महत्वाचे ठरत असतांना याविषयीची माहीती शेतकऱ्यांपर्यत पोहोचलीच नाही. कार्यक्रमास्थळी असलेल्या रिकाम्या खुर्चा आयोजकांच्या ढिसाळ नियोजनाचे प्रतिक बनल्या आहेत.अश्या प्रकारच्या कृषीमहोत्सवात नवीण वाणांची माहीती, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, कृषी उद्योजक, कृषी तज्ञ यांची थेट भेट, परिसंवाद, चर्च्चा व याद्वारे शेतकºयांच्या शंकाचे निरसन तसेच शेतकरी ते थेट ग्राहक विक्री याविषयीचे मार्गदर्शन महत्वपुर्ण ठरत असतांना प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही मागील महिण्यात एका खासगी संस्थेद्वारा कृषी प्रदर्शन आयोजित होते. त्याला शेतकºयांचा प्रतिसाद लाभला, या पार्श्वभुमीवर प्रत्यक्ष कृषी विभागाचे असलेल्या या प्रदर्शनात आकर्षणाचे मुख्य केंद्रबिंदुच असलेला शेतकरीच हरविला असल्याचे वास्तव आहे..शहरात असूनही कृषिमंत्र्याची महोत्सवाकडे पाठउद्घाटनाला कृषीमंत्री,गृहराज्यमंत्री,पालकमंत्री,खासदार जिल्ह्यातील सर्वच आमदारांना निमंत्रित करण्यात आले.प्रत्यक्षात ना.पांडुरंग फुंडकर पक्षाच्या बैठकीनिमित्य शहरात उपस्थित असताना फिरकलेच नाही. ना. रणजीत पाटील यांच्यासह बहुतेक आमदार अनुपस्थित होते. ना. प्रवीण पोटे यांच्यासह खासदार आनंदराव अडसूळ, आमदार रमेश बुंदिले उपस्थित होते. त्यामुळे उद्घाटनाची नियोजित वेळ पाच तासांनी वाढवूनदेखील कृषी विभाग तोंडघसी पडल्याचे वास्तव आहे.