शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘एसओएस’चा पुष्कर जिल्ह्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 23:16 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) बोर्ड नवी दिल्ली अंतर्गत घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. जिल्ह्यात या अभ्यासक्रमाच्या पाच शाळा आहेत.

ठळक मुद्देसीबीएसई १२वीचा निकाल नवोदयचा राहुल आगरकर, ‘एसओएस’चा चैतन्य वानखडे द्वितीय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) बोर्ड नवी दिल्ली अंतर्गत घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. जिल्ह्यात या अभ्यासक्रमाच्या पाच शाळा आहेत. यामध्ये स्कूल आॅफ स्कॉलर्सचा पुष्कर मानकर ९३.६ टक्के गुण मिळवूण जिल्ह्यात प्रथम आला, तर जवाहर नवोदय केंद्रीय विद्यालयाचा राहुल अगारकर व स्कूल आॅफ स्कॉलर्सचा चैतन्य वानखडे ९३.४ टक्के गुण घेऊन व्दितीय, तर नवोदयचीच पायल राठोड ९३.२ टक्के गुण मिळवून तृतीय राहिली. सीबीएसई बोर्डामार्फत ५ मार्च ते २७ एप्रिल दरम्यान परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा आॅनलाइन निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.स्कूल आॅफ स्कॉलर्सचा १०० टक्के निकालसीबीएसई बोर्ड अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत येथील स्कूल आॅफ स्कॉलर्सचा निकाल १०० टक्के लागला. यामध्ये पुष्कर मानकर ९३.६, चैतन्य वानखेडे ९३.४ व अंकित अग्रवाल ९२ टक्के गुण मिळाले. प्राचार्य सुरेश लकडे, उपप्राचार्य समिधा नहर आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.महर्षी पब्लिक स्कूलचा शतप्रतिशत निकालसीबीएसई बोर्ड अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत महर्षी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. यावर्षीसुद्धा १२ वी तिसऱ्या बॅचचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यामध्ये दीपांशू कडू ९१ टक्के, राघव सोमानी ८६ टक्के, रुग्वेद वाट ८४ टक्के, अस्मिता हजारी ८४ टक्के, शगून अग्रवाल ८० टक्के, तनय कोहळे ७९ टक्के या विद्यार्थ्यांचे यशाचे कौतुक केले जात आहे.पोटे इंटरनॅशनल स्कूलचे उल्लेखनीय यशपी. आर. पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांमध्ये सृष्टी भारती ९१ टक्के, प्रतीक देऊळकर ९० टक्के या व्यतिरिक्त ८० टक्केच्यावर चिरायुष निकोसे ८४ टक्के, विनीत काळे ८४ टक्के, रसिका सावरकर ८३ टक्के, सय्यद ओसामा काशीद ८१ टक्के तसेच ७० टक्केच्यावर एकूण २२ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. २०१७-१८ मध्ये एकूण ७३ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. यापैकी शाळेचा निकाल ८१ टक्के लागला. विशेष म्हणजे सी.बी.एस.ई. बारावीची ही पहिलीच बॅच होती. यामुळे पहिल्याच वर्षी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.जवाहर नवोदय केंद्रीय विद्यालययेथील जवाहर नवोदय केंद्रीय विद्यालयाचा निकाल ७९.७१ टक्के लागला. यावर्षी ६७ विद्यार्थ्यांनी इयत्ता १२ वीची परीक्षा दिली असून, सर्वच पास झाल्याची माहिती प्राचार्य मेश्राम यांनी दिली. यामध्ये राहुल आगरकर ९३.४, पायल राठोड ९३.२, शशीकांत तायडे ९२.२, देवेश देशमुख याला ९०.६ टक्के गुण मिळाले. यासाळेत ४ विद्यार्थी ९० ते ९५ टक्के, ४८ विद्यार्थी ७५ ते ८९ टक्के व १५ विद्यार्थी ६० ते ७४ श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.