शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांसमोर मांडल्या फासेपारधी समाजाच्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:15 IST

फासेपारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी सोमवारी महाराष्ट्र आदिवासी फासेपारधी समाज संघटनेचे अध्यक्ष मतीन भोसले यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे व जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनाद्वारा केली आहे.

ठळक मुद्देमतीन भोसले : न्याय देण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतअमरावती : फासेपारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी सोमवारी महाराष्ट्र आदिवासी फासेपारधी समाज संघटनेचे अध्यक्ष मतीन भोसले यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे व जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनाद्वारा केली आहे.राज्य शासनाकडून लोककल्याणकारी अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र, या योजनांचा लाभ फासेपारधी समाजाला मिळत नाही. त्यामुळे अद्यापही हा समाज विकासापासून वंचित आहे. या समाजाला न्याय देण्यासाठी राज्य शासना मार्फत शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकास घडवून आण्यासाठी जिल्हा परिषद, आदिवासी विकास विभाग, महसूल विभाग, पशुसंवर्धन, कृषी, शिक्षण, समाजकल्याण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तसेच अन्य विभागातून लोकहितार्थ राबविण्यात येणाºया सर्वच शासकीय योजनांचा लाभ फासेपारधी समाजाला मिळावा, या दृष्टीने शासनाने प्रयत्न करावे, अशी मागणी मतीन भोसले यांनी २२ जानेवारी रोजी पालकमंत्री प्रवीण पोटे, जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.मंगरूळ चव्हाळा येथे जय शिवाई महिला बचतगट आहे. या गटाला कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी शेड बांधकाम करण्यासाठी शासकीय अनुदास पात्र आहेत. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे हा अन्याय दूर करावा व योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ करणाºयांवर कारवाई करावी, घरकुल योजनेतही फासेपारधी समाजातील लाभार्थी पात्र असताना त्यांना प्रशासनाकडून सहकार्य केले जात नाही. त्यामुळे अद्यापही मंज़ूर असलेल्या घरकुलाचे कामे सुरू झाली नाहीत. ती सुरू करावी, यांसह अन्य मागण्यांकडे लोकप्रतिनिधी व अधिकाºयांचे लक्ष वेधून न्याय देण्याची मागणी मतीन भोसले यांनी केली आहे.यावेळी नूरदास भोसले, गजानन पवार, रंजित पवार, ललिता भोसले, चंद्रशेखर पवार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.