अमरावती : सारीच्या रुग्णावर उपचार केल्यानंतर कोविड कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालाला कोविड रुग्णालयात हलविण्याच्या सूचना डॉक्टरांनी केल्या. मात्र, ७० हजार रुपयांचे डॉक्टरांनी काढलेले बिल अमान्य असल्याचे सांगूृन रुग्णाच्या एका नातेवाईकांनी डॉक्टरांशी बाचाबाची केली. सोनोने हॉस्पटिलमधील कर्मचाऱ्यांनी त्या नातेवाईकालाच चोप दिल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी थेट गाडगेनगर ठाण्यात पोहचला. डॉक्टर व रुग्णाच्या पत्नीने आपापली बाजू ठाणेदारांकडे मांडली. यावेळी दोन्ही पार्टीने एकामेकांविरुद्ध तक्रार न दिल्याने या वादाचा ठाण्यातच समझोता झाला.
प्राप्त माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील अंबोड येथील रामदास तायडे (५१) यांची प्रकृती चांगली नसल्याने शेगाव नाक्यानजीक असलेल्या हदय व मधुमेह तज्ज्ञ सोनोने यांचे सोनोने हॉस्पटिलमध्ये आठ दिवसांपूर्वी गुरुवारी उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांना सारी आजार असल्याचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केला. मात्र बुधवारी रात्री त्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याने डॉ. सोनोने यांनी रुग्णाला कोविड रुग्णालयात पाठवावे लागले, असे रुग्णाच्या पत्नी मंदा तायडे यांना सांगितले. यावेळी ७० हजारांचे बिल काढले. हे बिल अधिक आहे. ते कमी करण्याची विनंती पत्नीने डॉक्टरांना केली. मात्र, बिल कमी न केल्याने रुग्णाच्या एका नातेवाईकाने गुरुवारी डॉक्टर सोनोने यांच्याशी हुज्जत घातली. हा प्रकार हॉस्पटिलच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी नातेवाईकाला धक्काबुक्की व मारहाण केल्याची तक्रार घेऊन मनोज वानखडे नामक व्यक्तीसुद्धा गाडगेनगर ठाण्यात पोहचला. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीकरिता पाठविले होते. मात्र, रुग्णाच्या नातेवाईकांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. आपण पैसे आधीच कमी केले आहे. रुग्णाला कोरोना निघाल्याने त्यांना कोविड रुग्णालयात पाठवावे लागले, असे डॉक्टरने ठाण्यात येऊन ठाणेदार आसाराम चोरमले यांना सांगितले. महिलेने ठाणेदारांकडे तोंडी कैफियत मांडली. हॉस्पिटलचा नर्ससह स्टाफ ठाण्यात पोहचला होता. तासभर एकामेकांची बाजू ठाणेदारांनी एकूण घेतल्यानंतर दोन्ही पार्टींची तक्रार न झाल्याने या वादावर पडदा पडला.
कोट
रुग्णाला जर कोरोना होता तर आधीच उपचार न करता रेफर करायला हवे होते. डॉक्टरांनी ७० हजार बिल काढले, ते अमान्य आहे. डॉक्टरांनी काहीही ऐकून घेतले नाही. उलट बिल भरून पेशंट घेऊन जा, असे सांगितले म्हणून न्याय मिळविण्याकरीता पोलिसांचा सहारा घ्यावा लागला.
- मंदा तायडे, अंबोडा ता. कारंजा लाड
कोट
रुग्णांची किंवा नातेवाईकांची कुठलेही तक्रार नाही. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा नोंदविला नाही. त्यांचा आपसी समझोता झाला.
- आसाराम चोरमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गाडगेनगर
कोट
डॉक्टरचा कोट आहे.