शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

बडनेऱ्यात काही भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:01 IST

नूरनगरातील ५३ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर प्रशासन अलर्ट झाले. संपूर्ण परिसर सॅनिटाइज करण्यात आला. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून नूरनगर, खाटीकपुरा, बारीपुरा, मुल्लापुरा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. सदर भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग बंद करण्याचे काम सुरू होते. जुनी वस्तीतील नूरनगर, इस्लामी चौक, अलमासनगर, बिलालनगर, खाटीकपुरा, बारीपुरा या परिसरात यूपीएल मशीनद्वारे फवारणी करण्यात आली.

ठळक मुद्देपरिसर सॅनिटाइज : हद्दी आवागमनासाठी बंद

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : जुनी वस्तीच्या नूरनगर परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये, यासाठी महापालिका आयुक्तांनी काही भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला. फक्त अत्यावश्यक कामासाठीच आवागमनाची परवानगी राहणार आहे.नूरनगरातील ५३ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर प्रशासन अलर्ट झाले. संपूर्ण परिसर सॅनिटाइज करण्यात आला. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून नूरनगर, खाटीकपुरा, बारीपुरा, मुल्लापुरा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. सदर भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग बंद करण्याचे काम सुरू होते. जुनी वस्तीतील नूरनगर, इस्लामी चौक, अलमासनगर, बिलालनगर, खाटीकपुरा, बारीपुरा या परिसरात यूपीएल मशीनद्वारे फवारणी करण्यात आली. या कामाची पाहणी सहायक आरोग्य अधिकारी अजय जाधव यांनी केली. महापालिका प्रशासनाकडून जनजागृती अभियान राबविले जात आहे. घरात राहा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क लावा, या बाबींची जनजागृती बडनेºयात प्रशासनाकडून होत आहे.हिस्ट्री शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान२३ एप्रिल रोजी बडनेऱ्यातील ५३ वर्षीय कोरोनाबाधित सासरी परतवाड्याला गेला होता. मात्र, नेमका कशासाठी गेला, हे पोलिसांनाकडून अद्याप पुढे आले नाही. तो औषधी घेण्याकरिता गेल्याची चर्चा आहे. त्यानंतरच्या दोन दिवसांत कोरोनाबाधित कुणाकुणाच्या संपर्कात आला, हे पोलिसांना शोधावे लागणार आहे. रुग्ण कोरोनाबाधित कसा झाला, याची साखळी प्रशासनाला शोधावी लागेल. दाटीवाटीची वस्ती असल्यामुळे अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.माळीपुऱ्याचा उल्लेख चर्चेतमहापालिका प्रशासनाने घोषित केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात नूरनगर, खाटीकपुरा, बारीपुरा, माळीपुरा या भागांचा उल्लेख आला होता. या यादीत माळीपुरा कसा, याची चर्चा शहरात होती. कारण हा भाग नूरनगरपासून बराच लांब येतो.‘त्या’ भागात ड्रोनद्वारे नजरबडनेरा जुनीवस्तीत नव्याने कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्यामुळे पोलीस, महापालिका प्रशासनाने अलर्ट जारी केले आहे. परिसराला प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्यात आले. त्यामुळे या भागावर पोलिसांकडून ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जात आहे. रविवारी सकाळी व सायंकाळी प्रत्येकी दोन तास ड्रोनद्वारे बारकाईने घटनाक्रम टिपला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या