अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालकपदांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत ४८ उमेदवार रिंगणात आहेत. २३ सप्टेंबर रोजी या उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. यात कुणाला नगारा, शिट्टी, कपबशी, विमान, तर काहींना टीव्ही, सनई-चौघडा, सिलिंग फॅन, पतंग अन् नारळ अशी चिन्हे उमेदवारांना मिळाली आहेत.
बँकेच्या २१ संचालकांपैकी चार उमेदवार अविरोध निवडून आले आहेत. यात वरूड, तिवसा, धारणी आणि नांदगाव खंडेश्वर या चार तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता १७ संचालकपदांसाठी आता निवडणूक होणार आहे. यात निवडणुकीच्या रिंगणात अमरावती तालुक्यातून अनंत देशमुख, सुनील वऱ्हाडे, भातकुलीमधून संतोष इंगोले, अमरदीप तेलखेडे, सुभाष बोंडे, सेवा सहकारी मतदारसंघातून .........., हरिभाऊ मोहोड, अचलपूरमधून आनंद काळे, रणजित चित्रकार, अजय पाटील, धामणगाव रेल्वेमधून श्रीकांत गावंडे, सुनील सिसोदे, दर्यापूरमधून अनिल जळमकर, अंजनगाव सुर्जीमधून अजय मेहकरे, जयंत साबळे, चिखलदरा दयाराम काळे, संभुजी खडके, मोर्शीमधून अरुण कोहळे, चित्रा डहाणे, अशोक रोडे, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून संतोष कोल्हे, गाेपाल चंदन, सुधाकर तलवारे, विजय वानखडे, वि.जा.भ.ज.वि.मा.प्र. मतदारसंघात पुरुषोत्तम अलोणे, सुधीर सूर्यवंशी यांच्यासह अन्य दिग्गज उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
बॉक्स
हायप्रोफाईल लढती
चांदूर बाजार तालुक्यात अ.सेवा सहकारी मतदारसंघात राज्यमंत्री बच्चू कडू व जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या लढत होणार आहे. याशिवाय बबलू देशमुख व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांच्यातही इतर मागासवर्गीय मतदारसंघात थेट लढत होणार आहे. चांदूर बाजार तालुक्यात अ.सेवा मतदारसंघात माजी आमदार वीरेंद्र जगताप आणि किशोर कडू, दर्यापूरमध्ये आमदार प्रकाश भारसकाळे आणि सुधाकर भारसकाळे, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात आमदार राजकुमार पटेल आणि बळवंत वानखडे रिंगणात आहेत. या हायप्रोफाईल उमेदवारांच्या लढती लक्षवेधी ठरणार आहेत.
बाॅक्स
या आहेत महिला प्रतिनिधी
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ब-४ महिला प्रतिनिधी मतदारसंघात भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांच्यासह जयश्री देशमुख, वैशाली राणे, मोनिका मार्डीकर वानखडे, माया हिवसे या सहा महिला निवडणुकीच्या रिंगणात आहेत.