आंदोलन : आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना निवेदनअमरावती : स्थानिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्र २ तपोवन मधील सात बंगला रस्त्याची समस्या नागरिकांनसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे या रस्त्याची समस्या महापालिकेने निकाली काढावी यासाठी ५ मे रोजी शिवसेनेच उपशहर प्रमुख अमोल निस्ताने यांच्या नेतुत्वात महापालिकेवर नागरिकांनी धडक दिली. यावेळी महापालिका आयुक्त चंद्रकात गुडेवार यांना निवेदन देऊन याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.सात बंगला परिसरात राहणारे नागरिक महापालिकेचा रितसर डेव्हल्पमेंन्ट चार्ज भरून घरांची परवानगी घेतली आहे. तेथे वातव्य करीत आहोत, मात्र या भागातील रस्त्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होते असल्याने नागरिकांना याचा फटका सहन करावा लागत आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने सात बंगला परिसरातील रस्त्याची समस्या त्वरित निकाली काढून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी नागरिकांनी आयुक्ताकडे निवेदनाव्दारे केली आहे.याबाबत प्रशासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेने दिला आहे. निवेदन देतेवेळी अमोल निस्ताने, मोहन क्षीरसागर, संजय देशमुख, सोमेश्र्वर धर्माळे, अंकुर डवरे, पवन इंगोले, गौरव ठाकरे, रमेश गिरी, अर्चना गिरी, संजय कदम, आकाश भिसे, पुरूषोत्तम उईके, भगवंत ठाकरे, विजया ठाकरे, संगीता काळे, नंदा गवळी, आशिक्ष घोगडे आदीचा सहभाग होता. (प्रतिनिधी)
रस्ता समस्या सोडविण्यासाठी महापालिकेवर शिवसेनेची धडक
By admin | Updated: May 6, 2015 00:14 IST