चांदूरबाजार : शिक्षण क्षेत्रातील समस्यांबाबत तसेच आवश्यक त्या सुधारणा तत्काळ करुन अपेक्षित कर्मचारी देण्यासाठी तालुका शिक्षक आघाडीच्यावतीने तहसीलदार हरीश राठोड यांना निवेदन देण्यात आले.स्थानिक चांदूरबाजार येथील तालुका शिक्षक आघाडीचे तालुकाध्यक्ष इकबाल हुसेन यांनी कार्यकर्त्यांसहीत सध्या परिस्थितीत महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात कनिष्ठ प्रकारच्या बदलामुळे शिक्षकांपुढे समस्या निर्माण झाल्या आहेत. यामध्ये नवीन संच मान्यता रद्द करण्यात यावी, अतिरिक्त ठरविण्यात आलेले शिक्षण निर्णयाला त्वरित स्थगिती देण्यात यावी, शिक्षण सेवकांना संरक्षण देण्यात यावे, तसेच सर्वविना अनुदानातीत शाळांना कायमस्वरुपी अनुदान द्यावे आणि अनुदानित शाळांना वेतनेत्तर अनुदान नियमित द्यावे व इतर अनेक शिक्षणविषयक समस्या त्वरित निकाली काढण्यात यावे अशा विविध मागण्यांसंदर्भात चांदूरबाजार तालुक्यातील शिक्षकांनी तहसील कार्यालयामध्ये येऊन आपल्या मागण्याचे निवदेन तहसीलदार यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी इकबाल हुसेन, शिक्षक आघाडीचे सचिव अमोल ठाकरे, शहर अध्यक्ष माधव संगेकर, सहसचिव हेमंत सिनकर, संदीप तडस, उदय देशमुख, भास्कर हिरडे, दीपक कळमखेडे उमेश भेले आदींसह शिक्षकेत्तर उपस्थित होते. (शहरप्रतिनिधी)
शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडवा
By admin | Updated: December 13, 2014 00:39 IST