शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदऱ्यात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 01:22 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत चिखलदरा नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ६१.७४ लाख रुपये एकूण खर्च असलेल्या या प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा चिखलदरा नगर परिषद राहील.

ठळक मुद्दे ६१.७४ लाखांचा खर्च : १४ व्या वित्त आयोगातून निधी खर्चाची मुभा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वच्छ भारत अभियानांतर्गत चिखलदरा नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ६१.७४ लाख रुपये एकूण खर्च असलेल्या या प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा चिखलदरा नगर परिषद राहील.राज्यातील ६० शहरांचा नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे सविस्तर प्रकल्प अहवालास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता देऊन ‘निरी’ या संस्थेने सदर प्रकल्पाचे मूल्यांकन अप्रायझल करण्यात आले आहे. ते प्रस्ताव शासन मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते. त्यात चिखलदरा नगरपरिषदेने पाठविलेल्या प्रस्तावास हिरवी झेंडी मिळाली आहे. डीपीआरनुसार प्रकल्पाचे एकूण किंमत ६१.७४ लाख रुपये आहे. त्यापैकी २१.६० लाख केंद्र तथा १४.४० लाख रुपये केंद्र व राज्यसरकार देईल, तर २५.७२ लाख रुपये चिखलदरा न.प.ला खर्च करावे लागतील. १४ व्या वित्त आयोगातून हा निधी खर्च करण्यास पालिकेला मुभा देण्यात आली आहे. त्या खर्चाला नगरविकास विभागाने १२ एप्रिलला प्रशासकीय मान्यता दिल्याने प्रकल्पाची अंमलबजावणी सुकर झाली आहे. डीपीआरनुसार प्रकल्पाची अंमलबजावणी करताना शहरात निर्माण होणाºया घनकचºयाचे निर्मितीचा जागीच १०० टक्के विलगीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय विलगीकरण केलेल्या कचºयाची विलगीकृत पद्धतीने वाहतूक करणे अनिवार्य आहे.कचरा संकलन व वाहतुकीवर ९.३९ लाखघनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत कचरा संकलन व वाहतुकीवर ९.३१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यात वाहनांची खरेदीसुद्धा आहे. २.१४ लाख डंपिंग यार्डमील बांधकाम व विंड्रो फ्लॅटफॉर्मवर ६.२४ लाख रुपये खर्च होतील. वेस्ट डिस्पोझलसाठी ३.९१ लाख व १७.४३ लाख रुपये साइट डेव्हलमेंटवर खर्च होतील. यात शौचालय, ड्रेनेज, हरित क्षेत्रविकास अग्निसुरक्षा, पाणीपुरवठाचा समावेश असेल व प्रकल्पातील उपकरणे, वाहने व यंत्रसामग्रीवर १६.९९ लाख रुपये खर्च होतील.