शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
4
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
5
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
6
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
7
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
8
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
11
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
12
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
13
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
14
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
15
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
16
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
17
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
18
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
19
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
20
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प गुंडाळला !

By admin | Updated: April 17, 2017 00:04 IST

महापालिकेचा बहुचर्चित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प चार महिन्यांपासून नगरविकास विभागाच्या फेऱ्यात अडकला आहे.

‘नगरविकास’चे दुष्टचक्र : महापालिका ‘बॅकफुट’वरअमरावती : महापालिकेचा बहुचर्चित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प चार महिन्यांपासून नगरविकास विभागाच्या फेऱ्यात अडकला आहे. हाप्रकल्प एप्रिल २०१७ पर्यंत न झाल्यास महापालिकेविरूद्ध कठोर कारवाई करण्याची तंबी एमपीसीबीने वर्षभरापूर्वी दिली होती. तथापि या प्रकल्पाची उभारणी लालफितशाहीत अडकल्याने प्रदूषण मंडळाकडून होणारी संभाव्य कारवाई जशी गुलदस्त्यात आहे, त्याचप्रमाणे महापालिकेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नगरविकास विभागाने गुंडाळला तर नसेल ना, अशी साशंक भीती व्यक्त होत आहे. मंत्रालयातील नगरविकास विभागाचे उपसचिव सुधाकर बोबडे यांच्याकडे याप्रकल्पाच्या उभारणीचा निर्णय चार महिन्यांपासून प्रलंबित आहे. आपण प्रकल्पाला स्थगिती दिली नसल्याचा पुनरूच्चार ते करतात. मात्र तक्रारींचा निपटारा नेमका कधी होईल, याबाबत कुणीही ‘ब्र’ काढायला तयार नाही.याप्रकल्पाविरोधात काही तत्कालिन नगरसेवकांनी आकाशपाताळ एक केले होते. त्यातील एक नगरसेवक आजमितीस महत्त्वाच्या पदावर आरुढ आहेत. त्यांच्यासह बहुतांश जणांनी प्रकल्पाच्या उभारणीबाबत सोईस्कर मौन धारण केल्याने प्रशासन बॅकफुटवर आले आहे. अनुभव असलेल्या ‘एलटू’ला निविदाप्रक्रियेत डावलल्याचा बाऊ करून काहींनी या प्रकल्पात विघ्न आणले आहे.कधीचाच ओव्हरफ्लो झालेल्या सुकळी कम्पोस्ट डेपोमधील ७ ते ८ लाख टन कचऱ्यावरील प्रक्रियेसह शहरातून दिवसाकाठी निघणाऱ्या २०० ते २५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारा हा प्रकल्प पीपीपी तत्वावर साकारण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला. त्यासाठी गतवर्षी निविदा प्रक्रिया राबविली. त्यातून ७.९९ कोटी रूपये खर्चून ४०० टन प्रतिदिवस क्षमतेचा प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविणाऱ्या आणि निविदा प्रक्रियेत ‘एल वन’ ठरलेल्या कोअर प्रोजेक्टची निवड करण्यात आली. तेवढीच रक्कम महापालिका खर्च करणार होती. तत्कालिन स्थायी समितीने त्या एजन्सीशी करारनामा करण्यास मान्यता दिली. ‘ते’ अधिकारी हतबल चार महिने उलटून गेल्यानंतरही नगरविकास विभागाने कुठलाही निर्णय न दिल्याने याप्रकल्पाच्या एकूणच उभारणीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. विशेष म्हणजे प्रकल्पाच्या उभारणीवर २००० गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणातील ४०० गुण अवलंबून होते. ते तेव्हाच शून्य झाले. याआधी हा प्रकल्प आचारसंहितेत अडकला होता. पारदर्शक प्रक्रिया करुन ४६ कोटी रुपयांचा प्रकल्प अवघ्या १५ कोटी रुपयांमध्ये उभारण्याचे आव्हान स्वीकारणारे अधिकारी यामुळे निराश आणि हतबल झाले आहेत.