शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा : ‘एनजीटी'त खटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 01:11 IST

महापालिकेद्वारा घनकचरा नियमांचे वारंवार उल्लंघन होत असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळही डोळेझाक करीत आहे. याविरोधात पर्यावरण प्रेमींनी राष्ट्रीय हरित लवादा (एनजीटी) मध्ये ७ आॅगस्टला प्रकरण दाखल केले आहे.

ठळक मुद्देमुद्दा प्रदूषणाचा। जिल्हाधिकारी, महापालिका अन् महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळही प्रतिवादी

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेद्वारा घनकचरा नियमांचे वारंवार उल्लंघन होत असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळही डोळेझाक करीत आहे. याविरोधात पर्यावरण प्रेमींनी राष्ट्रीय हरित लवादा (एनजीटी) मध्ये ७ आॅगस्टला प्रकरण दाखल केले आहे. यामध्ये जिल्हाधिकारी, महापालिकेसह प्रदूषण मंडळालाही प्रतिवादी बनविण्यात आल्याने महापालिकेच्या अडचणी वाढणार आहे.याविषयी पर्यावरणप्रेमी गणेश अनासने यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या असताना केवळ नोटीस बजावण्याव्यतिरिक्त काहीही केलेले नाही. त्यामुळे आता राष्ट्रीय हरित लवादाकडे घाव घेण्यात आली आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावणार, असे सांगत महापालिकेद्वारा मिहान एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेतले. मात्र, या कचºयावर अद्याप प्रक्रिया झालेली नाही. विशेष म्हणजे विमानतळापासून कचराडेपो हा २० किमीपेक्षा कमी अंतरावर नसावा, असा नियम असताना शहर व विमानतळ याच्यापासून २० किमी अंतरावर आहे, या नियमांचेदेखील उल्लंघन होत असल्याचे हरित लवादाच्या निदर्शनात आणून दिले.महापालिकेला कचराडेपोत प्रक्रिया करण्यासाठी अधिकृत मुदत ३१ जानेवारी २०१७ पर्यंत होती. अद्याप याचे नूतनीकरण झालेले नाही. यासाठी महापालिकेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी घेतली नसल्याने कचरा डेपोत जमा होणार कचरा नियमबाह्य असल्याचे अनासने म्हणाले. शहरात ओला, सुका कचरा व घातक कचरा वेगवेगळा केल्या जात नाही.सांडपाण्याने पेढी नदी प्रदूषितशहरातील घातक वैद्यकीय कचºयाबाबतची नोटीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने १७ जून २०१९ रोजी बजावली आहे. महापालिकेद्वारा सांडपाण्यावर कुठलीच प्रक्रिया न करता पेढी नदीत टाकण्यात येत असल्याने नदी प्रदूषित झालेली आहे. यासोबतच सांडपाणी व मैलावर प्रक्रिया होत नाही व हा प्रकार सध्याही सुरू असल्याबाबतची कागदपत्रे हरित लवादाकडे सादर केलेली आहे.एनजीटीचे कुठलेही पत्र प्राप्त नाही. एसडब्ल्यूएम-२०१६ अन्वये कार्यवाही प्रक्रियेत आहे. बायोमायनिंग, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट निविदा प्रक्रियेत आहे.- संजय निपाणे, आयुक्त, महापालिका

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका