अमरावती : सौर विद्युत कुंपण पद्धतीत प्राण्यांना मानसिकरीत्या भयभीत करून अडविण्यासाठी एक नियंत्रित व सुरक्षित असा विद्युतप्रवाह तारांमधून वाहत असतो. एखादा प्राणी या तारेच्या संपर्कात आला, की त्याला सुरक्षित झटका (शॉक) बसतो, त्यामुळे तो प्राणी या विद्युत कुंपणापासून लांब राहतो, या शॉकमुळे प्राण्यांचे शारीरिक नुकसान होत नाही. अशा रीतीने हे कुंपण प्राण्यांना केवळ शारीरिकदृष्ट्या नव्हे, तर मानसिकदृष्ट्या शेताजवळ येण्यास प्रतिबंधित करते. एकदा प्राण्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला, की ते कुंपणापासून दूर राहतात, अशावेळी काही काळासाठी वीजपुरवठा खंडित करून वीज बचत करता येते. ज्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने तारेचे कुंपण अगोदरपासून उपलब्ध असेल, अशा ठिकाणी एका किंवा दोन तारांमध्ये विद्युत प्रवाह सोडून प्रभावी सौर विद्युत कुंपण प्रणाली विकसित करता येते.यामुळे ही विद्युत कुंपण प्रणाली अतिशय सुरक्षित व कार्यक्षम ठेवलेली आहे. अशा कुंपण पद्धतीमध्ये अलार्म बसविल्यास आणि कुंपणाच्या सानिध्यात एखादा प्राणी आल्यास तो लगेच वाजायला सुरुवात होते. सौर विद्युत कुंपणाच्या प्रकारानुसार त्यासाठी लागणारा संभाव्य खर्च थोडाफार कमी-अधिक होऊ शकतो. तो १२ व्होल्ट डी.सी. प्रवाह प्रत्येक १.२ सेकंदानंतर ०.०३ सेकंदासाठी सतत पाठवीत असतो.कुंपण घंटा : ही घंटा ज्ञानेंद्रिय पद्धतीवर काम करते. एखादा प्राणी कुंपण्याच्या संपर्कात आल्यास लगेच ही घंटा वाजायला सुरुवात होते.बॅटरी : १२ व्होल्ट ४२ अॅपियरची बॅटरी वापरली जाते. ती सौर पॅनेलने चार्ज करता येते.चार्जर : सोलर पॅनेलपासून तयार झालेल्या विद्युतप्रवाह बॅटरीमध्ये व्यवस्थितरीत्या साठवण्यासाठी आणि येणारा विद्युतप्रवाह नियंत्रित करण्यासाठी याचा वापर केला जातो.खांब : खांब हे लाकडाचे, सिमेंटचे किंवा लोखंडापासून बनविलेले असतात. शक्यतो जास्त काळ यंत्रणा टिकून राहावी याचा विचार करूनच खांब खरेदी करावेत. साधारणत: त्यांची उंची ५ फुट एवढी असावी आणि आवश्यकतेनुसार जाडी ठेवावी.कुंपण तारा : कुंपण तारा साधारणत: २.५ मि.मी जाडीची, धातूपासून बनविलेली असते, ती गजू नये यासाठी त्यावर जास्ताचे आवरण दिले जाते.- सदानंद देशपांडे,श्रीनिवास इरिगेशन सर्व्हिसेस,अमरावती
शेतीच्या सुरक्षेसाठी सौर विद्युत कुंपण
By admin | Updated: June 1, 2016 00:49 IST