शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

माती होतेय वांझ !

By admin | Updated: February 26, 2017 00:04 IST

पीक उत्पादनवाढीसाठी शेतजमिनीचा पोत हा नैसर्गिक घटक आहे. यासाठी जमिनीची सुपीकता हा घटक महत्त्वाचा ठरतो.

नियमित परीक्षण महत्त्वाचे : जमिनीचा पोत सुधारणे आवश्यकअमरावती : पीक उत्पादनवाढीसाठी शेतजमिनीचा पोत हा नैसर्गिक घटक आहे. यासाठी जमिनीची सुपीकता हा घटक महत्त्वाचा ठरतो. मात्र. अलीकडे उत्पादनवाढीसाठी बेसुमार रासायनिक खतांचा वापर होत आहे. तिहेरी पीक घेण्यासाठी संकल्पना अलीकडेच रूजल्याने जमिनी सतत पाण्याखाली राहते. यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. दिवसेंदिवस जमिनीची उत्पादकता कमी होऊन जमीन वांझ होत आहे. अधिक उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांद्वारा बेसुमारपणे रासायनिक खतांचा वापर केला. कीटकनाशकांची फवारणी अधिक होत आहे. मात्र मातीचे परीक्षण करून कमी असलेल्या घटकाचा वापर करीत आधुनिक पद्धतीने शेती करणे आवश्यक आहे. जमिनीच्या पुनरुज्जीवनासोबत संवर्धनासाठी वास्तविकता जैविक घटकांचा वापर करणे महत्त्वाचे आहे. मात्र तसे होत नसल्याने उत्पादन वाढीसाठी भविष्यातील शेती मात्र साथ देणार नाही, अशी स्थिती आहे. खतांचा बेसुमार वापर धोक्याचाअमरावती : मातीचा पोत सुधारण्यासह आधुनिक पद्धतीत परंपरागत शेती पद्धतीची जोड देणे महत्त्वाचे आहे व हे आव्हान अलीकडेच शेतकऱ्यांना जाणवू लागले आहे. वास्तविकता माती ही एक प्रकारची जैविक संरचना आहे. मातीमध्ये अनेक सूक्ष्म जीव असतात. जे हवेतून नत्र व सूक्ष्म अन्नाचे तत्त्व घेऊन मातीला सुपीक करीत असतात. गांढूळासारखे जीवदेखील मातीची गुणवत्ता वाढवीत असतात. मात्र, रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे मातीची जैविक संरचना बिघडली आहे. मातीचे नैसर्गिक गुणधर्म कमी होऊन काही ठिकाणी माती वांझ झाली आहे. काही ठिकाणी सतत रासायनिक खतांचा वापर अधिक होत असला तरी मातीचे गुणधर्म लोप पावल्याने उत्पादनवाढीमध्ये मात्र उत्पादकता स्थिर झालेली नाही. देशी वाणात रोग प्रतिकारक क्षमता असते व रोगास कमी बळी पडतात. मात्र, रासायनिक खते व कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे पिकांची रोग प्रतिबंधक क्षमता कमी होत आहे. कीड रोगांची क्षमता वाढली. येथील मातीचा नमुना घेऊ नयेमाती परीक्षणासाठी शेतात झाडाखालील, विहीरीजवळील, निवास स्थानाजवळ, जनावरे बसण्याची जागा, पाणी साचत असलेले भाग या ठिकाणच्या मातीचा नमुना घेऊ नये व मातीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी रासायनिक खतांच्या रिकाम्या थैलीचा वापर करू नये, पॉलिथीन किंवा कापडी पिशवीत नमुना घेणे महत्वाचा आहे. नियमित पाणी परीक्षण, समृद्धीचे लक्षणजमिनीची रासायनिक व भौतिक तपासणी करणे गरजेचे आहे. यामध्ये जमिनीचा सामू (पी.एच.), विद्राव्य क्षारांचे प्रमाण, सेंद्रीय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फूरद, पालाश याचे गुणधर्म तपासणीसाठी मातीचे परीक्षण आवश्यक आहे व त्यानुसार सेंद्रीय रासायनिक खतांचा वापर केल्यास पिकांची उत्पादकता वाढते.नमुना घेण्याच्या पद्धतीवर परीक्षणाचे यश अवलंबूनमाती परीक्षणाचे महत्व त्याची सत्यता व त्यापासून मिळणारे फायदे मुख्यत: शेतातील मातीचा नमुना घेण्याचे पद्धतीवर अवलंबून आहे. मातीचा नमुना चुकीच्या पद्धतीने घेतल्यास परीक्षणाच्या इतर पैलूचे महत्त्व कमी होते व त्यापासून अपेक्षित फायदा होत नाही. त्यामुळे मातीचा नमुना शास्त्रीय पद्धतीने घेणे महत्त्वाचे आहे.जैविक श्रुंखला बाधितरासायनिक खतांच्या अधिक वापरामुळे जमिनीची पाणी धरण करण्याची क्षमता कमी होत आहे. कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे जैविक श्रुंखलाच बाधित झाली आहे. माणसांसह सर्व गुरांमध्ये याचा अंश पोहोचतो. अगदी आईच्या दुधातदेखील कीटकनाशकांचे अंश आढळल्याचे निष्कर्ष जैविक विभागाच्या संशोधनात आढळून आले आहेत. क्षारतेच्या प्रमाणात वाढबागायती शेतीमध्ये सिंचनासाठी सतत पाळीद्वारे पाणी दिले जात असल्याने जमिनीतील क्षार वाढली आहे. पाणी साठणे, दलदल होणे याचा थेट परिणाम जमिनीच्या आरोग्यावर होतो. कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर पाण्याद्वारे या विषाचे अंश नदिनाल्यात पाहोचतात. तसेच कीटकनाशकांचा परिणाम हवेमुळे वातावरणातदेखील पोहोचतो.