शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘सॉफ्टटेक’ बेमुर्वतखोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:00 IST

बांधकाम परवानगीच्या आॅनलाइन अर्जांची छाननी करणारे सॉफ्टवेअर पुरविणाºया सॉफ्टटेक इंजिनिअर्स या कंपनीचा बेमुर्वतखोरपणा उघड झाला आहे.

ठळक मुद्देएडीटीपीचे अभय : सात पत्रांनंतर ‘अपडेशन’ची हमी

आॅनलाईन लोकमतअमरावती : बांधकाम परवानगीच्या आॅनलाइन अर्जांची छाननी करणारे सॉफ्टवेअर पुरविणाºया सॉफ्टटेक इंजिनिअर्स या कंपनीचा बेमुर्वतखोरपणा उघड झाला आहे. नवीन डिसी रुल्सप्रमाणे सॉफ्टवेअरचे अद्ययावतीकरण करण्यात यावे, अशी महापालिकेची सूचना अव्हेरून मनमर्जीने ही कंपनी काम करीत असल्याचे स्पष्ट झाले असून, कंपनीच्या अनियमिततेला एडीटीपी विभागाच्या वरदहस्त लाभल्याचा आरोप आहे.सन २०१० पासून पुण्याची सॉफ्टटेक इंजिनिअर्स प्रा.लि. या एजन्सीने महापालिकेत आॅटोडीसीआर (आॅटोमॅटिक डेव्हल्पमेंट कंट्रोल रेग्युलेशन) प्रणाली कार्यान्वित केली आहे. नगररचना विभागाच्या सहायक संचालक कार्यालयास आॅनलाइन प्राप्त होणाºया बांधकाम नकाशांचे तांत्रिक छाननी करून देण्याची प्रक्रिया ‘आॅटोडीसीआर’मधून साध्य होते. अर्थात बांधकाम नकाशावर ही प्रणाली अंतिम शिक्कामोर्तब करते. सॉफ्टटेकला त्यासाठी ११ रुपये प्रतिचौरस मीटरचे छाननी शुल्क मिळते, तर महापालिकेला सहा रुपये दिले जातता. याशिवायही कंपनी नकाशासाठी अतिरिक्त शुल्क आकारते. या कंपनीने आतापर्यंत अमरावतीकरांकडून छाननीपोटी ३ ते ३.५ कोटी रुपये प्राप्त केले आहेत.दरम्यान, राज्य शासनाने राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकांसाठी २० सप्टेंबर २०१६ रोजी एकरूप विकास नियंत्रण नियमावली मंजूर केली. त्याअनुषंगाने सॉफ्टटेकला आॅटोडीसीआर सॉफ्टवेअरचे अद्ययावतीकरण करणे अनिवार्य होते. त्यासाठी महापालिकेने २६ आॅगस्ट २०१६ ते ६ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत तब्बल सात वेळा पत्रव्यवहार केलेत. नवीन डीसी रुल्स अस्तित्वात आल्यानंतर वर्षभर सॉफ्टटेकला अपडेशनला मुहूर्त मिळाला नाही. यावरून सॉफ्टटेकच्या लेखी मनपा प्रशासनाला फारसे महत्त्व नसल्याचे अधोरेखित झाले आहे. प्रचंड अनियमिततेचा आरोप असलेली आॅटोडीसीआर प्रणाली वर्षभराच्या पाठपुराव्यानंतरही सॉफ्टटेकने अपडेट केली नाही. त्यावरून या कंपनीचा बेजबाबदारपणा उघड झाला आहे. मात्र, या कंपनीवर कारवाई करण्याचे धाडस वा देयके थांबविण्याची तसदी एडीटीपी घेऊ शकले नाहीत. यावरून आर्थिक लागेबांधेही उघड झाले आहेत. महापालिकेच्या पत्रांना केराची टोपली दाखविणारी सॉफ्टटेक छाननीपोटी मात्र ५० लाख रुपये कमावते, हा भाग अलाहिदा.सॉफ्टटेकला नियमबाह्य मुदतवाढप्रायोगित तत्त्वावर सन २०११ मध्ये सुरू करण्यात आलेल्या सॉफ्टटेकच्या आॅटोडीसीआर प्रणालीचा करारनामा २०१६ पर्यंत होता. मात्र, त्यानंतर या कंपनीस पुन्हा सन २०२१ पर्यंत नियमबाह्य मुदतवाढ देण्यात आली. त्यात स्थायी समितीचीही दिशाभूल करण्यात आली. कुठलीही ई-निविदा न करता सॉफ्टटेकला मागच्या दाराने पाच वर्षांची दिलेली मुदतवाढ अनेकांचे खिसे भरून मिळवून घेतल्याची ओरड आहे.